Home / देश-विदेश / Indigo Airline : पुणे ते मुंबई विमान प्रवास तब्ब्ल ६१ हजार रुपयांचा; विमान प्रवासाचे दर वाढले

Indigo Airline : पुणे ते मुंबई विमान प्रवास तब्ब्ल ६१ हजार रुपयांचा; विमान प्रवासाचे दर वाढले

Indigo Airline : इंडिगो कंपनीने अचानकपणे आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था एखाद्या बस स्टँडसारखी झाल्याचे दिसून...

By: Team Navakal
Indigo Airline
Social + WhatsApp CTA

Indigo Airline : इंडिगो कंपनीने अचानकपणे आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था एखाद्या बस स्टँडसारखी झाल्याचे दिसून येत आहे. अचानकपणे फ्लाईट रद्द झाल्याने विमानतळावर मोठा गोंधळ उडाला आणि प्रवाशांची मोठी गर्दी देखील विमानतळावर पाहायला मिळाली.
इंडिगाने यासंधर्बाहत पत्रक जारी करत प्रवाशांची माफी देखील मागितली आहे.

मात्र, अचानक विमानसेवा खंडीत झाल्याने पुणे, मुंबई, कोलकाता, दिल्ली, बंगळुरू येथील प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. एका विमातळावरुन दुसरीकडे मार्गस्थ होणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली आहे. त्यातच, पुण्याहून मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूला जाणाऱ्या विमानांच्या तिकिटांचे दर मात्र गगनाला भिडला आहे. पुणे ते मुंबई विमान प्रवास (Passenger) करण्यासाठी तब्बल ६१ हजार रुपये प्रवाशांना मोजावे लागत आहेत. त्यामुळे, प्रवाशांकडून मोठा संताप व्यक्त केला जात आहे.

इंडिगो एरलाईन्स कंपनीच्या ऑपरेशन समस्यांमुळे इतर विमान कंपन्यांनी आपल्या तिकीट दरात वाजवीपेक्षा जास्त वाढ केली. त्यानुसार, पुणे ते मुंबई विमानाचे तिकीट ६१ हजार रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. तर, पुणे ते दिल्ली विमानाचे तिकीट २७ हजार आणि पुण्याहून बंगळुरूसाठी ४९ हजार रुपये प्रवाशांना मोजावे लागत आहे.

सलग चौथ्या दिवशी इंडिगो कंपनीला ऑपरेशनल समस्यांशी गंभीरपणे झुंजावे लागत आहे. आणि या सगळ्याचा फटका प्रवाशांना बसला आहे. विमान उड्डाणाची संख्या कमी झाल्यामुळे इतर विमान कंपन्यांची तिकिटं मात्र चौपट दराने विकली जात आहेत आणि हे अत्यंत चुकीचं आहे. देशभरातून इंडिगोची तब्बल ६०० हून अधिक विमाने आज रद्द केली. त्यामध्ये राजधानी दिल्लीतून आज रात्री ११.५९ वाजेपर्यंत इंडिगोचे एकही विमान उड्डाण होणार नाही, असे पत्रच कंपनीकडून जारी करण्यात आले. त्यामुळे, प्रवाशांकडून मोठा संताप व्यक्त केला जात आहे.


हे देखील वाचा – Indigo Flight Crisis : ऐनवेळी इंडिगोचे विमान झालं रद्द; नवविवाहित जोडप्याने स्वतःच्याच रिसेप्शनला लावली व्हिडिओ कॉलवर हजेरी..

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या