Home / देश-विदेश / इंडिगो आणि स्पाइसजेटच्या विमानांचे आपत्कालीन लँडिंग

इंडिगो आणि स्पाइसजेटच्या विमानांचे आपत्कालीन लँडिंग

नवी दिल्ली –दिल्लीहून लेहला जाणारे इंडिगोचे (Indigo) विमान ६ इ २००६ हे तांत्रिक बिघाडामुळे आज सकाळी दिल्लीला परतले. याशिवाय, स्पाइसजेटचे...

By: Team Navakal
IndiGo and SpiceJet flights

नवी दिल्ली –दिल्लीहून लेहला जाणारे इंडिगोचे (Indigo) विमान ६ इ २००६ हे तांत्रिक बिघाडामुळे आज सकाळी दिल्लीला परतले. याशिवाय, स्पाइसजेटचे (SpiceJet) विमान एसजी २६९६ ही उड्डाणानंतर १० मिनिटांनी परतले. स्पाइसजेटचे हे विमान हैदराबादहून तिरुपतीला (Hyderabad to Tirupati) जात होते.

इंडिगोचे विमान ६ इ २००६ आज सकाळी सुमारे ६:३० वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (Indira Gandhi International Airport) लेहकडे रवाना झाले होते . या विमानात क्रू सदस्यांसह सुमारे १८० प्रवासी होते. लेहच्या कुशोक बकुला रिमपोछे विमानतळावर लँडिंग होण्यापूर्वीच विमानात तांत्रिक बिघाड आढळून आला. सुरक्षेच्या दृष्टीने वैमानिकांनी तात्काळ निर्णय घेऊन विमान पुन्हा दिल्लीला परत आणले. दिल्ली विमानतळावर ते सुरक्षितपणे उतरवण्यात आले.

स्पाइसजेटचे विमान एसजी २६९६ आज सकाळी ६:१० वाजता हैदराबादहून तिरुपतीसाठी उड्डाण करण्यासाठी सज्ज होती. हे विमान तिरुपतीला सकाळी ७:४० वाजता पोहोचण्याची अपेक्षा होती. मात्र, उड्डाणानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाड लक्षात आला. वैमानिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून विमान पुन्हा हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Rajiv Gandhi International Airport) परत आणले. विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले. स्पाइसजेटकडून जारी केलेल्या निवेदनात सांगण्यात आले की, उड्डाणानंतर काही वेळातच एएफटी बॅगेज दरवाजाचा चेतावणी दिवा अधूनमधून चालू होत आहे असे लक्षात आले. मात्र, केबिनमधील दाब सामान्य होता. तरी खबरदारीचा उपाय म्हणून विमान परत आणण्यात आले. प्रवाशांना सुरक्षित उतरवण्यात आले असून तिरुपतीसाठी पुढील प्रवासासाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. ही आपत्कालीन लँडिंग नव्हती.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या