Home / देश-विदेश / भारतीय नौदलात दोन नवीन युद्धनौका दाखल; ‘INS उदयगिरी’ आणि ‘INS हिमगिरी’ मध्ये काय आहे खास?

भारतीय नौदलात दोन नवीन युद्धनौका दाखल; ‘INS उदयगिरी’ आणि ‘INS हिमगिरी’ मध्ये काय आहे खास?

INS Udaygiri and INS Himgiri:

INS Udaygiri and INS Himgiri: भारतीय नौदलाची (Indian Navy) ताकद आणखी वाढली आहे. आयएनएस उदयगिरी (INS Udaygiri) आणि आयएनएस हिमगिरी (INS Himgiri) युद्धनौकांचा नौदलाच्या ताफ्यात समावेश झाला आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी विशाखापट्टणम येथील नौदल तळावर दोन बहु-उद्देशीय स्टेल्थ फ्रिगेट INS उदयगिरी आणि INS हिमगिरी यांचे जलावतरण केले. हे दोन्ही युद्धनौका प्रोजेक्ट 17A मालिकेतील आहेत.

विशेष म्हणजे, भारतीय नौदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन वेगवेगळ्या शिपयार्डमध्ये तयार झालेल्या युद्धनौका एकाच वेळी नौदलात दाखल झाल्या आहेत.

INS Udaygiri and INS Himgiri: नवीन युद्धनौकांचा इतिहास

यापूर्वीही INS उदयगिरी (1976-2007) आणि INS हिमगिरी (1974-2005) या नावाच्या युद्धनौकांनी भारतीय नौदलात सेवा बजावली आहे. आता त्यांच्या आधुनिक उत्तराधिकारी म्हणून या नवीन युद्धनौका तयार करण्यात आल्या आहेत. या नवीन फ्रिगेट्सची रचना अधिक चांगली असून, त्यात अत्याधुनिक शस्त्रे आणि सेन्सर प्रणाली बसवण्यात आली आहेत.

प्रगत वैशिष्ट्ये आणि शस्त्रे

या युद्धनौकांमध्ये अनेक प्रगत क्षमता आहेत, ज्यात लांब पल्ल्याच्या Surface-to-Air Missiles, Supersonic BrahMos Missile, स्वदेशी बनावटीचे रॉकेट लाँचर, टॉर्पेडो लाँचर, कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टीम आणि फायर कंट्रोल सिस्टीम यांचा समावेश आहे. या दोन्ही युद्धनौका समुद्रातील अत्यंत धोकादायक मोहिमांमध्ये ‘गेम चेंजर’ ठरतील, असेही राजनाथ सिंह म्हणाले.

या युद्धनौका ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाचे उत्तम उदाहरण आहेत, कारण त्यामधील 75% भाग स्वदेशी आहे. त्यांच्या बांधकामामुळे 200 हून अधिक एमएसएमई (MSMEs) उद्योगांना मदत झाली आणि सुमारे 4,000 थेट आणि 10,000 अप्रत्यक्ष रोजगार निर्माण झाले.

उदयगिरी, हिमगिरीची निर्मिती

INS उदयगिरी ही मुंबईच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने तयार केली आहे. या वर्गातील युद्धनौकांमध्ये ही सर्वात कमी वेळेत तयार करण्यात आली आहे. INS हिमगिरी ची निर्मिती कोलकाता येथील गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स यांनी केली आहे.

या दोन्ही युद्धनौका 6,700 टन वजनाच्या आहेत. त्यांची रचना अशी आहे की त्या रडारवर लवकर दिसत नाहीत. या फ्रिगेट्समध्ये हेलिकॉप्टरही ठेवता येते, ज्यामुळे पाणबुडीविरोधी युद्धात, टेहळणीमध्ये आणि बचाव मोहिमांमध्ये मदत होते.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

‘… म्हणून अमित शाह पुढील 50 वर्ष सत्तेत राहण्याचा दावा करतात’; ‘मतचोरी’च्या आरोपांवरून राहुल गांधींची जोरदार टीका

‘भारताने ‘विश्वगुरू’ बनून जगाला मार्गदर्शन करावे’; मोहन भागवत यांचे महत्त्वाचे विधान, हिंदू संस्कृतीवर म्हणाले…

१ सप्टेंबरपासून सांगली महापालिकेचे कामकाज ऑनलाइन

Share:

More Posts