Home / देश-विदेश / Iran Israel Conflict: ‘…तर पाकिस्तान इस्रायलवर अणुबॉम्ब हल्ला करणार’, इराणी अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

Iran Israel Conflict: ‘…तर पाकिस्तान इस्रायलवर अणुबॉम्ब हल्ला करणार’, इराणी अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

Iran Israel Conflict | इराण-इस्त्रायल संघर्षामुळे मध्य पूर्वेतील वाढला आहे. इस्त्रायलने इराणच्या अणवस्त्र कार्यक्रमला नष्ट करण्यासाठी केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील...

By: Team Navakal
Iran Israel Conflict

Iran Israel Conflict | इराण-इस्त्रायल संघर्षामुळे मध्य पूर्वेतील वाढला आहे. इस्त्रायलने इराणच्या अणवस्त्र कार्यक्रमला नष्ट करण्यासाठी केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संर्ष वाढला आहे. त्याततच आता एका इराणी अधिकाऱ्याने पाकिस्तान इस्त्रायलवर अणुबॉम्ब हल्ला करू शकतो, असा दावा केला आहे.

इराणच्या विशेष दलाचे वरिष्ठ अधिकारी जनरल मोहसेन रेझाई यांनी खळबळजनक दावा केला आहे. इस्रायलने इराणवर अणुबॉम्ब हल्ला केल्यास पाकिस्तान इस्रायलवर अणुहल्ला करेल, असे त्यांनी मुलाखतीत सांगितले. सध्या इराण आणि इस्रायल यांच्यात क्षेपणास्त्र हल्ल्यांची तीव्र देवाणघेवाण सुरू आहे. आतापर्यंत या संघर्षात 248 जणांचा मृत्यू झाला आहे, यात इराणमध्ये 230 आणि इस्रायलमध्ये 18 जणांचा समावेश आहे.

इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) मधील वरिष्ठ अधिकारी आणि इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सदस्य असलेल्या रेझाई यांनी सांगितले की, पाकिस्तानने इराणच्या पाठीशी उभे राहण्याची शपथ घेतली आहे. “इस्रायलने इराणवर अणुबॉम्ब वापरल्यास पाकिस्तान इस्रायलवर अणुहल्ला करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे,” असे त्यांनी नमूद केले. रेझाई यांनी मुस्लिम जगाला एकत्र येण्याचे आवाहनही केले आणि तेहरानकडे गुप्त क्षमता असल्याचा दावा केला.

आंतरराष्ट्रीय अणुबॉम्ब निर्मूलन मोहिमेनुसार (ICAN), पाकिस्तान आणि इस्रायल हे अणुबॉम्ब असलेल्या नऊ देशांपैकी आहेत. पाकिस्तानने इस्रायलच्या अणुक्षमतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे, परंतु रेझाई यांच्या दाव्यावर पाकिस्तानकडून थेट प्रतिक्रिया आलेली नाही. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी इस्रायलला “उद्दाम राज्य” संबोधत पाश्चिमात्य देशांना चिंता व्यक्त करण्याचे आवाहन केले.

ट्रम्प यांचा मध्यस्थीचा प्रयत्न

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायल यांच्यात करार घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला आहे. इराणला कठोर इशारा देताना म्हटले की, “जर इराणने अमेरिकेवर हल्ला केला, तर अमेरिकेचे सशस्त्र दल संपूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर देईल.” अमेरिकेने या संघर्षात थेट लष्करी सहभाग नाकारला आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या