Home / देश-विदेश / IRCTC Ticket Cancellation: रेल्वेने केले नवीन बदल, ऐनवेळी ट्रेन तिकीट रद्द करता येणार?

IRCTC Ticket Cancellation: रेल्वेने केले नवीन बदल, ऐनवेळी ट्रेन तिकीट रद्द करता येणार?

IRCTC Ticket Cancellation: शेवटच्या क्षणी तुमचा रेल्वे प्रवास पुढे ढकला असेल आणि तुमचे तिकीट (Ticket) रद्द करायचा त्रास सहन करावा...

By: Team Navakal
IRCTC Ticket Cancellation

IRCTC Ticket Cancellation: शेवटच्या क्षणी तुमचा रेल्वे प्रवास पुढे ढकला असेल आणि तुमचे तिकीट (Ticket) रद्द करायचा त्रास सहन करावा लागत असेल तर लवकरच तुम्हाला याबाबत काही अधिक प्रमाणात दिलासा मिळू शकतो. भारतीय रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. या अंतर्गत आता कन्फर्म तिकिटांची प्रवास तारीख देखील ऑनलाइन (Online) मोफत पद्धतीने बदलता येईल. अशा परिस्थितीत, प्रवाशांना(Passanger) आता त्यांची तिकिटे(Ticket) रद्द करण्याची गरज भासणार नाही, ज्यामुळे रद्दीकरण शुल्काचा त्रास देखील कमी होईल.

रेल्वे तिकीट कॅन्सल करायचा नियम बदलणार

आता सध्या अशी कोणतीही पद्धत नाही आणि याशिवाय प्रवाशांचे ट्रॅव्हल प्लॅन बदलले तर त्यांना त्यांचे तिकिटे रद्द करावी लागतात आणि नवीन तारखेसाठी पुन्हा बुकिंग करावे लागते. यामुळे नवीन बुकिंगचा खर्च देखील वाढतो, याशिवाय जुन्या तिकिटावर कॅन्सलेशन शुल्क देखील आकारले जाते. यामुळे प्रवाशांना दुहेरी नुकसानीला सामोरे जावे लागते.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आयआरसीटीसी (IRCTC) आणि इतर एजन्सींना यावर काम जलद करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या ही सुविधा फक्त ऑफलाइन तिकिटांसाठी उपलब्ध आहे परंतु, लवकरच ऑनलाइन प्रवाशांसाठी देखील लागू केली जाऊ शकते. रेल्वे यावर काम करत आहे आणि लवकरच, प्रवासी ऑनलाइन तिकिटांची तारीख देखील बदलू शकतील.

यासंदर्भांतील काही नियम:

सध्या एखाद्या प्रवाशाला त्यांच्या प्रवासाची तारीख बदलायची असेल, तर त्याला त्यांचे तिकीट रद्द करावे लागेल. या शिवाय नवीन तिकीट बुक करावे लागते. यासाठी कॅन्सलेशन शुल्क आकारले जाईल. मात्र, नवीन नियमांमध्ये प्रवासी तिकीट रद्द न करता त्यांच्या तारखा बदलू शकतील ज्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचतील.


हे देखील वाचा –

Gautami Patil : गौतमी पाटीलने अपघातानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया..रिक्षाचालकांच्या कुटुंबियांना भेटणार नाही

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या