Home / देश-विदेश / दोन मुख्यमंत्र्यांना बेड्या ठोकणाऱ्या ईडीच्या अधिकाऱ्याचा राजीनामा

दोन मुख्यमंत्र्यांना बेड्या ठोकणाऱ्या ईडीच्या अधिकाऱ्याचा राजीनामा

नवी दिल्ली – दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Delhi Chief Minister Arvind Kejriwal) आणि झारखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री हेमंत सोरेन...

By: Team Navakal
Enforcement Directorate


नवी दिल्ली – दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Delhi Chief Minister Arvind Kejriwal) आणि झारखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Jharkhand Chief Minister Hemant Soren )यांना अटक करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे अंमलबजावणी संचलनालयाचे (ED) अधिकारी कपिल राज (४५) यांनी सोळा वर्षांच्या सेवेनंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.


केंद्रीय अर्थमंत्रालयाने एका निवेदनात ही माहिती दिली. कपिल राज (IRS officer Kapil Raj)यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी (President ) स्वीकारला आहे,असे निवेदनात म्हटले आहे.
मुंबईत ईडीचे उप संचालकपदी कार्यरत असताना त्यांनी नीरव मोदी, मेहुल चोकसी, डीएचएफएल आणि इकबाल मिर्ची प्रकरणांचा तपास केला होता. इलेक्ट्रॉनिक्स मुंबईत या विषयातून बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीची पदवी संपादन केलेले कपिल राज भारतीय महसूल सेवेतील (Indian Revenue Service) २००९ च्या बॅचचे (2009-batch )अधिकारी आहेत.त्यांनी पंधरा वर्षांचा सेवाकाळ शिल्लक असताना वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला.

Web Title:
संबंधित बातम्या