Israel attacks Syria | इस्त्रायलने सीरियाच्या राजधानी दमास्कसवर तीव्र हल्ले केले आहे. इस्त्रायलने (Israel attacks Syria) देखील सीरियाच्या सैन्याला लक्ष्य केल्याने दोन्ही देशातील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. अरब अल्पसंख्याक गटाला पाठिंबा देण्यासाठी हल्ला करण्यात आल्याचा दावा इस्त्रायलने केला आहे. 1
सीरियाने या हल्ल्यांना ‘धोकादायक ’ असे म्हटले असून असून, परराष्ट्र मंत्रालयाने इस्त्रायलवर तणाव वाढवण्याचा आणि सुरक्षितता धोक्यात घालण्याचा आरोप केला आहे. या हल्ल्यातआतापर्यंत 15 संरक्षण आणि गृह मंत्रालयाचे कर्मचारी ठार झाल्याचे सांगितले जात आहे.
हल्ल्याचे कारण काय? (Israel attacks Syria Reason)
इस्त्रायलचे हवाई हल्ले सुवेदा येथे सीरियन सरकारी दल आणि स्थानिक ड्रुझ सैनिकांमध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या प्राणघातक चकमकींनंतर झाले. ड्रुझ सैनिक आणि स्थानिक बेडौइन जमातींमध्ये एकमेकांचे अपहरण आणि हल्ल्यांनी हिंसाचाराला सुरुवात झाली होती.
त्यानंतर सरकारी सैन्याने सुव्यवस्था राखण्यासाठी हस्तक्षेप केला. मात्र ड्रुझ गटांशी झालेल्या संघर्षात 250 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. इस्त्रायल द्रुज अल्पसंख्याकांचे संरक्षण आणि शत्रू शक्तींना रोखण्याचा दावा करत आहे, पण सीरियाने हे ‘उघड आक्रमण’ म्हटले आहे.
हल्ले कुठे आणि कसे झाले?
इस्त्रायलने दमास्कसच्या मध्यभागी संरक्षण मंत्रालय आणि राष्ट्रपती भवनाजवळील भागांना लक्ष्य केले. या हल्ल्यांमध्ये दमास्कसमध्ये अनेक इमारतींचे नुकसान झाले, तर काही जणांना प्राण गमवावे लागले. तसेच, सुवेयदा शहरावर ड्रोन हल्ले झाले, जे ड्रुझ समुदायाचे केंद्र आहे आणि जॉर्डन सीमेजवळ आहे.
सीरियाने हल्ल्यांना आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग मानले असून, अरब देशांनीही निंदा केली. नवीन सरकार सुवेयदावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, पण इस्त्रायलच्या धमक्यांमुळे अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे.
हे देखील वाचा –