Home / देश-विदेश / ‘संधी मिळाली असती तर इराणच्या सर्वोच्च नेत्याला संपवले असते’, इस्त्रायलच्या संरक्षणमंत्र्यांचा मोठा खुलासा

‘संधी मिळाली असती तर इराणच्या सर्वोच्च नेत्याला संपवले असते’, इस्त्रायलच्या संरक्षणमंत्र्यांचा मोठा खुलासा

Israel – Iran War | इस्त्रायल आणि इराण यांच्यातील 12 दिवसांच्या तणावपूर्ण संघर्षानंतर युद्धविराम झाला आहे. त्यातच आता इस्त्रायलचे संरक्षणमंत्री...

By: Team Navakal
Israel - Iran War

Israel – Iran War | इस्त्रायल आणि इराण यांच्यातील 12 दिवसांच्या तणावपूर्ण संघर्षानंतर युद्धविराम झाला आहे. त्यातच आता इस्त्रायलचे संरक्षणमंत्री इस्त्रायल काट्झ यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना ठार मारण्याची संधी मिळाली असती, तर आम्ही त्यांना संपवले असते, असे काट्झ यांनी म्हटले आहे.

एका मुलाखतीत बोलताना काट्झ म्हणाले, “खामेनी आमच्या दृष्टीक्षेपात आले असते, तर आम्ही त्यांना नक्कीच संपवले असते. पण आम्हाला त्यासाठी ऑपरेशनल संधी मिळाली नाही.”

त्यांनी पुढे सांगितले की, खामेनींना हा धोका कळला असावा, म्हणूनच ते भूमिगत झाले आणि त्यांनी नव्या कमांडरशीही संपर्क तोडला. रिपोर्टनुसार, 13 जून रोजी इस्त्रायलने इराणच्या अणुबॉम्ब प्रकल्पांवर केलेल्या हल्ल्यात अनेक वरिष्ठ कमांडर आणि शास्त्रज्ञ मारले गेले, त्यानंतर खामेनी सार्वजनिकपणे दिसले नाहीत.

ट्रम्प आणि नेतन्याहू यांचा इशारा

युद्धाच्या सुरुवातीला इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही खामेनी हे थेट लक्ष्य असू शकतात, असे संकेत दिले होते. युद्धामुळे इराणमध्ये सत्ता परिवर्तन होण्याची शक्यता होती. अखेरीस, अमेरिकेच्या मध्यस्थीने 25 जून 2025 रोजी युद्धबंदी जाहीर झाली, ज्याने हा संघर्ष थांबला.

खामेनींचा व्हिडीओ संदेश

युद्धबंदीनंतरखामेनी यांनी इराणच्या सरकारी टेलिव्हिजनवर रेकॉर्डेड व्हिडीओ प्रसारित करत पहिल्यांदा सार्वजनिक हजेरी लावली. त्यांनी यात इस्त्रायलवर विजय मिळवल्याचा दावा केला आणि अमेरिकेचा हस्तक्षेप अयशस्वी ठरल्याचे म्हटले. “इराणने विजय मिळवला आणि अमेरिकेच्या कनाशिलात लगावली,” असे खामेनी म्हणाले होते.

दरम्यान, या 12 दिवसांच्या युद्धात इराणमध्ये 610 हून अधिक नागरिकांचा बळी गेला, तर इस्त्रायलमध्ये 28 जण मारले गेले. इराणच्या अणु प्रकल्पांवरील हल्ल्यांमुळे त्यांच्या संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. युद्धबंदीमुळे तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी दोन्ही देशांमधील तणाव कायम आहे.

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या