Jagdeep Dhankhar : या वर्षी जुलैमध्ये देशाचे उपराष्ट्रपती म्हणून राजीनामा दिल्यापासूनजगदीप धनखड पहिल्यांदाच एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसले आहेत. भोपाळमध्ये RSS चे अखिल भारतीय कार्यकारी सदस्य मनमोहन वैद्य लिखित ‘हम और यह विश्व’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलताना त्यांनी ‘नॅरेटिव्ह’च्या जाळ्यात अडकण्याचा धोका बोलून दाखवला.
‘चक्राव्यूहात फसलात तर…’
‘नॅरेटिव्ह’चा उल्लेख करताना धनखड म्हणाले: “…देव करो, कोणीही नॅरेटिव्हच्या समस्येत अडकू नये. कोणी या सापळ्यात अडकल्यास बाहेर पडणे खूप कठीण आहे’. यानंतर त्यांनी ‘मी माझे उदाहरण देत नाहीये,’ असे मिश्किलपणे म्हणताच सभागृहात हशा पिकला.
यावेळी कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, ‘आपण कठीण काळात जगत आहोत. ही गोष्ट माझ्यापेक्षा अधिक चांगली कोणाला माहिती असेल. आपण कठीण काळात आहोत. आपल्यालाच ही स्थिती सुधारावी लागेल.’
#WATCH | Bhopal, Madhya Pradesh | At the launch of the book ‘Hum Aur Yah Vishva,’ written by RSS All India Executive Member Manmohan Vaidya, Former Vice President Jagdeep Dhankar says, "…In today's time, people are drifting away from morality and spirituality. 'Main flight… pic.twitter.com/OWbfcEy0XO
— ANI (@ANI) November 21, 2025
अचानक दिला होता राजीनामा
या वर्षी जुलैमध्ये संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला होता. तेराज्यसभा अध्यक्षही होते, यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त झाले होते आणि विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली होती.
राजीनाम्यानंतर त्यांनी साधलेल्या ‘शांततेवरून’ देखील विरोधी पक्षांनी सरकारला लक्ष्य केले होते. काँग्रेसने ( गेल्या महिन्यात म्हटले होते की, धनखड राजीनाम्यानंतर 100 दिवस ‘पूर्णपणे शांत’ आहेत. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी तर ‘पीएमची स्तुती करूनही त्यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडले गेले,’ असा गंभीर आरोप केला होता.
धनखड यांनी माहिती युद्ध आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्स, ब्लॉकचेन आणि मशीन लर्निंग यांसारख्या विघटनकारी तंत्रज्ञानाच्या वाढीचा उल्लेख केला. काही लोक नैतिकता, अध्यात्म आणि बुद्धिमत्तेपासून दूर जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
धनखड यांच्या राजीनामा पत्रातील भाव
दरम्यान, उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देताना धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ‘अटूट समर्थनाबद्दल’ आणि कार्यकाळात असलेल्या ‘अद्भुत सुसंवादी कामकाजाच्या संबंधांबद्दल’ कृतज्ञता व्यक्त केली होती. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळ यांचेही आभार मानले होते. देशाच्या आर्थिक वाढीचे आणि परिवर्तनाचे साक्षीदार होणे हा विशेषाधिकार असल्याचे त्यांनी म्हटले होते.
हे देखील वाचा – Royal Enfield Himalayan चे खास एडिशन भारतात लाँच; फीचर्स जबरदस्त; पाहा किंमत









