Home / देश-विदेश / Jaipur Accident : जयपूरमध्ये मद्यधुंद ट्रक चालकाने १७ गाडयांना चिरडलं..

Jaipur Accident : जयपूरमध्ये मद्यधुंद ट्रक चालकाने १७ गाडयांना चिरडलं..

Jaipur Accident : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एक अत्यंत भीषण अपघात झाला आहे. एका डंपर ट्रकने एकापाठोपाठ एक अशा तब्बल १७...

By: Team Navakal
Jaipur Accident
Social + WhatsApp CTA

Jaipur Accident : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एक अत्यंत भीषण अपघात झाला आहे. एका डंपर ट्रकने एकापाठोपाठ एक अशा तब्बल १७ वाहनांना धडक दिली आहे. यात १९ जणांचा जागीच मृत्यू झाला असून यात ४० हून अधिक जण जखमी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृतांचा आकडा अधिक वाढण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, हा अपघात हरमाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लोहा मंडीजवळ घडला. दुपारी १ वाजताच्या सुमारास रोड क्रमांक १४ वरून एक रिकामा डंपर ट्रक चुकीच्या दिशेने राष्ट्रीय महामार्गाकडे जात होता, त्याचवेळी डंपर ट्रक सर्व प्रथम एका दुचाकीला धडक दिली. त्यावेळी लोकांनी पाठलाग सुरू केल्यानंतर चालकाने ट्रक भरधाव वेगाने पुढे नेला. जवळपास १ किलोमीटर अंतर पार केल्यानंतर भरधाव ट्रकने अनेक वाहनांना धडक दिली आहे.यात डंपर ट्रक चालकाने मद्यप्राशन केले होते, असे समोर येत आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे आणि दारू पिल्याची खात्री करण्यासाठी वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. अपघाताची तीव्रता इतकी जास्त होती की, कार आणि दुचाकी एकमेकांमध्ये आणि डंपरखाली अडकल्या होत्या. स्थानिक लोकांनी त्वरित मदतकार्य सुरू केले.


हे देखील वाचा –
Prakash Surve : शिंदेंच्या शिवसेना आमदाराचं आक्षेपार्ह वक्तव्य..

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या