Home / देश-विदेश / अब्जाधीश जेफ बेझोस पुन्हा बोहल्यावर, जाणून घ्या कोण आहेत त्यांच्या पत्नी लॉरेन सांचेझ?

अब्जाधीश जेफ बेझोस पुन्हा बोहल्यावर, जाणून घ्या कोण आहेत त्यांच्या पत्नी लॉरेन सांचेझ?

Jeff Bezos Wedding | ॲमेझॉनचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले जेफ बेझोस पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकले आहेत....

By: Team Navakal
Jeff Bezos Wedding
Social + WhatsApp CTA

Jeff Bezos Wedding | ॲमेझॉनचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले जेफ बेझोस पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांनी त्यांची मैत्रीण लॉरेन सांचेझसोबत इटलीतील व्हेनिस शहरात शाही विवाह सोहळ्यात लग्नगाठ बांधली.

लॉरेन यांनी इन्स्टाग्रामवर लग्नाचा पहिला फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी जाहीर केली. सॅन जिओर्जिओ मॅगिओर बेटावर पार पडलेल्या या सोहळ्याला अनेक बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली, ज्यामुळे हा विवाह चर्चेचा विषय ठरला आहे.

लग्नाचा थाट आणि लॉरेन यांचा लूक

लॉरेन यांनी पारंपरिक पांढऱ्या रंगाचा लेस गाऊन परिधान केला होता, तर जेफ बेझोस क्लासिक टक्सीडोमध्ये दिसले. लॉरेन यांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना फक्त ‘06/27/2025’ असे कॅप्शन दिले, ज्यावरून लग्नाची तारीख स्पष्ट झाली.

त्यांनी लग्नानंतर त्यांच्या इन्स्टाग्रामवरील सर्व फोटो आर्काइव्ह करून फक्त लग्नाचा फोटो ठेवला आणि अकाउंटचे नाव ‘लॉरेन सांचेझ बेझोस’ असे बदलले, ज्यावरून त्यांनी जेफ यांचे आडनाव स्वीकारल्याचे दिसते.

या शाही सोहळ्याने व्हेनिस शहर अब्जाधीश आणि सेलिब्रिटींच्या भेटीचे ठिकाण बनले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प पती जॅरेड कुशनेर आणि मुलांसह उपस्थित होती. याशिवाय, ओप्रा विन्फ्रे, किम कार्दशियन, क्रिस जेनर, ऑरलँडो ब्लूम यांसारख्या हॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. भारतातून उद्योजक मोना पटेल आणि नताशा पूनावाला यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला.

लॉरेन सांचेझ कोण आहेत?

1969 मध्ये न्यू मेक्सिकोमध्ये जन्मलेल्या लॉरेन सांचेझ एक यशस्वी पत्रकार आणि टीव्ही होस्ट आहेत. ‘एक्स्ट्रा’ आणि ‘गुड डे एलए’ या टीव्ही शोमधून त्यांनी नाव कमावले. वयाच्या 40व्या वर्षी त्या हेलिकॉप्टर पायलट बनल्या आणि ‘ब्लॅक ऑप्स एव्हिएशन’ ही महिलांच्या मालकीची पहिली एरिअल फिल्म प्रॉडक्शन कंपनी स्थापन केली. त्या ‘बेझोस अर्थ फंड’च्या उपाध्यक्षा आहेत आणि 2024 मध्ये त्यांनी ‘द फ्लाय हू फ्लू टू स्पेस’ हे मुलांचे पुस्तक लिहिले.

हे जेफ बेझोस आणि लॉरेन सांचेझ यांचे दुसरे लग्न आहे. जेफ यांचे यापूर्वी मॅकेन्झी स्कॉट यांच्यासोबत लग्न केले होते. तर लॉरेन यांचे पॅट्रिक व्हाईटसेल यांच्याशी लग्न झाले होते. ब्लूमबर्गनुसार, 238 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह जेफ बेझोस हे सध्या जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या