Home / देश-विदेश / Gold chain Dog : ज्वेलरी शॉपचा रखवालदार! कुत्र्याच्या अंगावर ५० तोळे सोने

Gold chain Dog : ज्वेलरी शॉपचा रखवालदार! कुत्र्याच्या अंगावर ५० तोळे सोने

Gold chain Dog : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) उन्नाव येथील एक ज्वेलरी दुकान सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या...

By: Team Navakal
Gold chain Dog

Gold chain Dog : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) उन्नाव येथील एक ज्वेलरी दुकान सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या ज्वेलरी शॉपची रखवाली चक्क एक गावठी कुत्रा करत आहे. खास बाब अशी की, या कुत्र्याच्या गळ्यात चक्क ५० तोळे (Gold chain 580 grams)सोन्याची खरीखुरी साखळी आहे.

उन्नावच्या गांधीनगर येथील सराफा व्यापारी कृपाशंकर जयस्वाल (Kripashankar Jaiswal) यांनी आपल्या राधाकृष्ण ज्वेलर्स (Radhakrishna Jewellers)नामक दुकानाच्या संरक्षणाची जबाबदारी सुरक्षा रक्षकांऐवजी चक्क आपल्या देशी कुत्र्यावर टाकली आहे. या कुत्र्याचे नाव टायसन असे असून हा कुत्रा केवळ दुकानाची राखवालीच करत नाही, तर गळ्यात तब्बल ५० तोळ्यांची सोनसाखळी घालून फिरतो. अत्यंत महागडी सोनसाखळी घालून फिरणाऱ्या या कुत्र्याला पाहण्यासाठी दूरवरून लोक येत आहेत. तसेच आता या कुत्र्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

दुकानदाराने सांगितले की, टायसन हा दुकानाच्या आतबाहेर दोन्हीकडे सुरक्षेची जबाबदारी सांभाळतो. ग्राहक येतात तेव्हा केवळ वास घेऊन त्याची ओळख पटवतो. एवढेच नाही तर दुकानाच्या आजूबाजूला फिरणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर लक्ष ठेवून असतो. टायसनच्या गळ्यात ५० तोळ्यांची चेन असल्याचा दावा सोशल मीडियावरून केला जात आहे. मात्र सोन्याच्या साखळीबाबत विचारले असता दुकानदाराने त्याबाबत काहीही सांगण्यास नकार दिला.


हे देखील वाचा –

जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करा; जैन समाजाचा एकदिवसीय उपवास

उबाठानंतर मनसेचे प्रेझेंटेशन ; राज ठाकरेही मतचोरी उघड करणार

आठव्या वेतन आयोगाला मंजुरी 1 जानेवारी 2026 पासून लागू?

Web Title:
संबंधित बातम्या