Home / देश-विदेश / Jio launches AI Classroom:  AI कोर्स शिका फुकटात; Jio चा भारतीयांसाठी नवीन प्लॅन! Jio मार्फत AI Classroom कोर्स!

Jio launches AI Classroom:  AI कोर्स शिका फुकटात; Jio चा भारतीयांसाठी नवीन प्लॅन! Jio मार्फत AI Classroom कोर्स!

Jio launches AI Classroom: भारताची डिजिटल जगातली प्रगती हि वाखाण्याजोगी आहे. आता डिजिटल शिक्षण सुद्धा डिजिटलीच केले जात. इंडिया मोबाईल...

By: Team Navakal
Jio launches AI Classroom

Jio launches AI Classroom: भारताची डिजिटल जगातली प्रगती हि वाखाण्याजोगी आहे. आता डिजिटल शिक्षण सुद्धा डिजिटलीच केले जात. इंडिया मोबाईल काँग्रेस २०२५ (आयएमसी २०२५) या दरम्यान, रिलायन्स जिओने एक नवीन आराखडा आणला आहे. एआय क्लासरूम फाउंडेशन कोर्स नावाचा एआय कोर्स त्यांनी लाँच केला.

जिओने ४ आठवड्यांचा कोर्स हा पूर्णपणे मोफत केला आहे. एआयच्या पाऊल ठेवण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी हा कोर्स फायद्याचा ठरणार आहे. जिओने आयएमसी २०२५ च्या उद्घाटन दिवशी या विशेष कोर्सची घोषणा केली होती. हा कोर्स या http://www/jio.com/ai-classroom वेबसाईट वर पाहता येईल.

या कोर्सचे  तास आणि वेळ कधी पासून सुरु होईल?

११ ऑक्टोबरपासून लेक्चर स्लॉट सुरू होणार आहेत. कंपनीच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, लेक्चरची वेळ सकाळी ०९वाजता, दुपारनंतर १२ वाजता त्यानंतर ४ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता आणि रात्री ९ वाजता अशी आहे. या बद्दलची संपूर्ण माहिती वेबसाइटवर मिळू शकेल. या कोर्समध्ये, सर्व विद्यार्थ्यांना AI टूल्सबद्दल अधिक माहिती दिली जाईल. त्यांना या तंत्रज्ञानाचे कार्य आणि गुंतागुंत समजून घेण्याची संधी देखील दिली जाईल. या दरम्यान, तुम्हाला AIची बेसिक माहिती आणि प्रोजेक्ट्स कसे ऑर्गेनाइज करावे आणि त्याचे डिझाइन कसे करावे हे शिकवले जाईल. पहिला आठवड्यात  AI बेसिक्स माहिती आणि प्रॉम्प्ट इंजीनियरिंग हे शिकवली जाईल. दुसऱ्या आठवड्यात क्रिएटिव्हिटीसाठी एआय शिकवलं जाईल. आणि तिसऱ्या आठवड्यात बिल्डिंग आणि कम्युनिकेशनसाठी एआयचा वापर कसा करायचा हे शिकवलं जाईल.


हे देखील वाचा –

Omkar elephant: हत्तीला आठ दिवसात पकडणार; वनविभागाचे आश्वासन!

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या