नवी दिल्ली- एक राष्ट्र, एक निवडणूक (One nation, one election) या विधेयकावर चर्चा करण्यासाठी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीची (JCP) पुढील बैठक ३० जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी माजी सरन्यायाधीश न्या. राजेंद्र मल लोढा आणि न्या. शरद अरविंद बोबडे यांना आमंत्रित केले जाऊ शकते असे समितीचे अध्यक्ष आणि भाजपाचे (BJP) खासदार पी. पी. चौधरी यांनी सांगितले.
या समितीचे अध्यक्ष पी. पी. चौधरी यांच्या नेतृत्वाखालील समिती विधेयकावर आपले मत देण्यासाठी न्यायतज्ज्ञ आणि कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत करत आहे. आठव्या बैठकीत भारताचे माजी सरन्यायाधीश न्या. जे. एस. खेहर आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी समितीसमोर आपले विचार मांडले. या चर्चेबाबत माहिती देताना चौधरी म्हणाले की, समिती या विषयावर अत्यंत गांभीर्याने चर्चा करत आहे. भारताचे माजी सरन्यायाधीश आणि विविध कायदेतज्ज्ञांनी आपले विचार मांडले आहेत, जेणेकरून हे सुचवलेले धोरण देशाच्या घटनात्मक चौकटीत बसते की नाही हे समजून घेता येईल.
समिती आपला अहवाल केव्हा सादर करणार याबाबत विचारले असता चौधरी म्हणाले. यामध्ये कोणतीही घाई केली जाणार नाही.