Home / देश-विदेश / परग्रहावर जीवनाचे संकेत! ‘या’ ऐतिहासिक शोधामागील वैज्ञानिक निक्कू मधुसूदन कोण आहेत?

परग्रहावर जीवनाचे संकेत! ‘या’ ऐतिहासिक शोधामागील वैज्ञानिक निक्कू मधुसूदन कोण आहेत?

Who is Dr. Nikku Madhusudhan | शास्त्रज्ञांनी आपल्या सौरमालेच्या बाहेर असलेल्या K2-18b या ग्रहावर जीवन असण्याची शक्यता दर्शवणारे महत्त्वाचे पुरावे...

By: Team Navakal
Dr. Nikku Madhusudhan

Who is Dr. Nikku Madhusudhan | शास्त्रज्ञांनी आपल्या सौरमालेच्या बाहेर असलेल्या K2-18b या ग्रहावर जीवन असण्याची शक्यता दर्शवणारे महत्त्वाचे पुरावे शोधले आहेत. केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांनी या ग्रहाच्या वातावरणात असे रासायनिक रेणू (Chemical Molecules) सापडले आहेत, जे पृथ्वीवर फक्त सूक्ष्मजीव तयार करतात.

‘डायमिथाइल सल्फाइड’ या रेणूंची उपस्थिती

प्रा. निक्कू मधुसूदन यांच्या नेतृत्वाखालील केंब्रिजच्या संशोधन पथकाने नासाच्या James Webb Space Telescope (जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप) चा वापर करून हे संशोधन केले. त्यांनी K2-18b च्या वातावरणात डायमिथाइल सल्फाइड (DMS) आणि डायमिथाइल डायसल्फाइड (DMDS) हे जैविक रेणू सापडल्याचा दावा केला आहे. हे रेणू पृथ्वीवर समुद्रातील फायटोप्लँक्टनसारख्या जीवांमुळे निर्माण होतात.

प्रा. मधुसूदन यांनी या शोधाबाबत “सावध आशावाद” व्यक्त केला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, ही रसायने कोणत्याही अज्ञात नैसर्गिक प्रक्रियेमुळे देखील तयार होऊ शकतात. त्यामुळे हा शोध अंतिम नसून, अजून सैद्धांतिक व प्रयोगशाळेतील तपासणी आवश्यक आहे.

निक्कू मधुसूदन – कोण आहेत हे भारतीय मूळचे वैज्ञानिक?

प्रा. निक्कू मधुसूदन हे केंब्रिज विद्यापीठात Exoplanetary Science आणि Astrophysics विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी MIT मधून MS आणि PhD पूर्ण केले असून, त्यांनी आपले बी.टेक IIT-BHU मधून पूर्ण केले आहे. ‘Hycean Worlds’ या संशोधन प्रकल्पाचे ते प्रमुख आहेत. त्यांच्या कामाचे केंद्रबिंदू बाह्यग्रह, त्यांचे वातावरण, राहण्यायोग्यता आणि Biosignatures हे आहेत.

पुरस्कार व मान्यतेचा सन्मान

प्रा. मधुसूदन यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यामध्ये 2019 चा MERAC Prize, Pilkington Award (University of Cambridge), 2016 चा IUPAP Young Scientist Award, 2014 चा Vainu Bappu Gold Medal आणि येल विद्यापीठाचा YCAA Fellowship यांचा समावेश आहे.

हा शोध अत्यंत रोमांचक असला तरी अंतिम निष्कर्ष काढण्यासाठी अजून डेटा (Data) गोळा करणे आणि तपासणे आवश्यक आहे. प्रा. मधुसूदन म्हणतात, “आम्ही निर्णायक पुरावे मिळवण्यासाठी पुढचे संशोधन लवकरच सुरू करणार आहोत.” हा शोध खगोलशास्त्र आणि बाह्यग्रह विज्ञान क्षेत्रासाठी एक मोठी झेप ठरू शकतो.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या