Kangana Ranaut And Supriya Sule Dance : इतर दिवशी राजकारणाच्या आखाड्यात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांची राळ उडवून देणारे नेते आता पक्षीय भेद विसरून एकत्रित येऊन नृत्याची रंगीत तालीम करत असलयाचे चित्र सध्या चांगलेच वायरल होताना दिसत आहे. खासदार कंगना राणावत (Kangana Ranaut ) यांनी यासंबतात एक स्टोरी शेअर केली आहे.
त्या फोटोत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) आणि स्वत: नवीन जिंदाल नृत्याची तालीम करताना दिसत आहे. सहकारी संसद सदस्यांसोबतचे काही फिल्मी क्षण असे कॅप्शन देऊन नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नाच्या संगीताची तालीम करत असल्याचे, कंगनाने या स्टोरीत म्हटले आहे.

उद्योगपती आणि जिंदाल स्टील अँड पॉवरचे अध्यक्ष नवीन जिंदाल यांनी २००४ मध्ये कुरुक्षेत्रातून काँग्रेस खासदार म्हणून संसदेत जोरदार प्रवेश केला होता. जिंदाल २००९ मध्ये पुन्हा एकदा निवडून आले होते. त्यानंतर २०१४ नंतरच्या काळात त्यांचे काँग्रेस पक्षात मन रमेनासे झाले. मग ते २०२४ मध्ये त्यांनी भाजपच्या तिकीटावर कुरुक्षेत्र हरियाणा येथून निवडणूक लढवली आणि पुन्हा एकदा संसदेत पाऊल ठेवले.
हे देखील वाचा –









