Karnataka Battle : देशात विविध राज्यात सध्या निवडणूका पार पडत आहेत. या आधी देशात अनेक दशक कॉग्रेसने सत्ता गाजवली. पण हि सत्ता काँग्रेसला टिकवून ठेवता आली नाही. आता काँग्रेसची सत्ता असलेली देशात फक्त तीनच राज्य उरली आहेत. त्यात प्रामुख्याने तेलंगणा हिमाचल प्रदेश आणि त्याहून महत्त्वाचे राज्य म्हणजे कर्नाटक राज्य हि तीनही राज्ये राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाची आणि मोठे असल्याचे मानले जातात.सध्या कर्नाटक राज्यामध्ये मुख्यमंत्रीपदावरून स्पर्धा सुरू असल्याने काँग्रेस पक्ष चांगलाच कोंडीत सापडला आहे.परंतु आता सगळी मजल फक्त पक्षश्रेष्ठी कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कर्नाटकमध्ये २०२३ मध्ये विधानसभेच्या २२४ जागंपैकी काँग्रेसला १३७ जागा मिळाल्या होत्या, तर भाजपला फक्त ६३ जागांवरच समाधान मानाव लागल होत.
मात्र काँग्रेसला बहुमत मिळूनसुद्धा पुढे मुख्यमंत्री निवडीत काँग्रेसला आठवडा लागला. काँग्रेसच्या सततच्या आपसी मतभेदातून काँग्रेसचा वारंवार पराभव होत गेला. काँग्रेसची या आधीचा मान मरातप या सगळ्या नाराजी नात्यामुळे धुळीत मिळाला.
कर्नाटकात २० नोव्हेंबर २०२५ रोजी कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने अडीच वर्षांचा आपला कार्यकाळ पूर्ण केला. अर्थात मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांचा निम्मा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर डी. के. शिवकुमार यांच्या समर्थकांनी दिल्लीत कूच करत आपल्या नेत्याला राज्यात सर्वोच्च पद द्यावे यासाठी ठाण मांडला. याच मुद्द्यावरून गेले दहा दिवस बंगळूरु ते दिल्ली असे खल सुरू आहे.
सिद्धरामय्या यांनी याआधी ‘अहिंदा’ समीकरण भक्कम ठेवत काँग्रेसला भरगोस यश मिळवून दिले. यामध्ये काही जातींचा समावेश होता प्रामुख्याने अल्पसंख्याक, इतर मागासवर्गीय आणि दलित समुदायाचा देखील यात समावेश आहे. त्यामुळे यावेळी देखील त्यांना असेच यश मिळेल का हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
आणि आता नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभेतील दारुण पराभवानंतर काँग्रेसवर चौफेर दबाव आहे. आणि यावेळी जर पुन्हा एकदा भाजपणे बाजी मारली तर भाजपसाठी कर्नाटक हे दक्षिणेतील सत्तेचे प्रवेशद्वार आहे. काँग्रेसच्या होणाऱ्या पराभवानंतरण आता जर मुख्यमंत्रीपदावरून वाद जर चिघळला तर त्याचा परिणाम काँग्रेसच्या विजयावर होऊ शकतो. आणि अर्थात याचा याचा लाभ विरोधी पक्षांना जास्त होईल. त्यामुळेच काँग्रेस श्रेष्ठींचे वाद सोडवने कठीण जाणार असल्याचे दिसत आहे. काँग्रेसला दोन्ही नेत्याना दुखावणे महागात पडणारेच आहे. एकीकडे शिवकुमार दुखावले जाणार नाहीत, दुसरीकडे सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वामुळे पक्षाचा जो सामाजिक आधार आहे तो दुरावणार नाही याची जास्त खबरदारी घ्यावी लागणार आहे.
हे देखील वाचा –









