Education – कर्नाटकमध्ये यापुढे (Karnataka) दहावी आणि बारावी परीक्षेत (Class 12)केवळ ३३ टक्के गुण मिळाले तरी संबंधित विद्यार्थ्यांना उत्तीर्ण म्हणून गृहीत धरले जाणार आहे. अशी माहिती शालेय शिक्षण आणि साक्षरता खात्याचे मंत्री मधू बंगारप्पा (Minister Madhu Bangarappa.)यांनी दिली.शैक्षणिक ताण कमी करण्यासाठी आणि शिक्षणात सुलभता सुधारण्यासाठी एक पाऊल असल्याचे हे बंगारप्पा म्हणाले.
या नवीन नियमाची अंमलबजावणी
२०२५-२६ सालापासून (2025–26 academic year)होणार असून यंदा परीक्षेला हजर होणाऱ्या रिपीटर, ब:हिस्थ विद्यार्थ्यांनाही हा नियम लागू असणार आहे, असेही शिक्षणमंत्री बंगारप्पा म्हणाले. त्यांनी सांगितले की, दहावी वार्षिक परीक्षेत ६२५ पैकी २०६ गुण मिळाले तरी विद्यार्थी उत्तीर्ण ठरणार आहेत.
तर बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी ६०० पैकी १९८ गुण पुरेसे आहेत. अंतर्गत गुण आणि वार्षिक परीक्षेतील गुण मिळून ३३ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. परीक्षा व्यवस्थेत सुधारणा म्हणून ३ परीक्षा व्यवस्था जारी करण्यात आली आहे. परीक्षा पारदर्शकपणे व्हाव्यात यासाठी वेब कास्टिंग केले जात आहे.
हे देखील वाचा –
आमदार गायकवाडना झटका कॅन्टीनचे जेवण उत्तमच होते
कैद्याला फाशी ऐवजी विषारी इंजेक्शन केंद्राचा पर्याय देण्यास विरोध का ? सुप्रीम कोर्टाचा सवाल
हिंदी फलक , चित्रपट, गाण्यांवर तामिळनाडूत बंदीचे विधेयक येणार