Home / देश-विदेश / Karnataka Elephant : कर्नाटकातील मालावल्ली तालुक्यात हत्ती कालव्यात पडला; बचावकार्य सुरू

Karnataka Elephant : कर्नाटकातील मालावल्ली तालुक्यात हत्ती कालव्यात पडला; बचावकार्य सुरू

Karnataka Elephant : कर्नाटकातील मालावल्ली तालुक्यातील शिवनसमुद्रा जवळील एका खाजगी वीज निर्मिती प्रकल्पातील कालव्यात एक हत्ती पडला आहे. माळवल्ली तालुक्यातील...

By: Team Navakal
Karnataka Elephant
Social + WhatsApp CTA

Karnataka Elephant : कर्नाटकातील मालावल्ली तालुक्यातील शिवनसमुद्रा जवळील एका खाजगी वीज निर्मिती प्रकल्पातील कालव्यात एक हत्ती पडला आहे. माळवल्ली तालुक्यातील शिवनसमुद्रा जवळील पायोनियर जंको लिमिटेड पॉवर जनरेशन प्लांटच्या कालव्यात एक हत्ती पडला आहे आणि गेल्या तीन दिवसांपासून तो बाहेर पडण्यासाठी धडपडत आहे.

शनिवारी रात्री खाजगी वीज निर्मिती केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या २० फूट रुंद कालव्याच्या गेटमधून हत्ती पाणी पिण्यासाठी खाली उतरला होता. तथापि, पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने हत्ती कालव्यातून बाहेर पडू शकला नाही आणि तो तिथेच भटकत राहिला.

रविवारी या हत्तीची हालचाल लक्षात आलेल्या प्लांटच्या कर्मचाऱ्यांना वाटले कि हा हत्ती निघून जाईल. संध्याकाळपर्यंत हत्ती वर न आल्यामुळे त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. वन विभागाने कारवाई सुरू केली आणि या हत्तीला कालव्यातून बाहेर काढण्यासाठी विविध पद्धती वापरल्या.
सोमवारी संध्याकाळपर्यंत हत्ती बाहेर न आल्यामुळे, केआरएस धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यासाठी त्यांनी उपायुक्तांशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून हत्ती अन्नाशिवाय असल्याचे पाहून, कर्मचाऱ्यांनी ऊसही आणला आणि कालव्यात टाकला. हत्तीला डार्ट करून क्रेनच्या मदतीने उचलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दोन क्रेन त्या ठिकाणी आणण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. वन उपसंरक्षक डी. रघू म्हणाले की, ते रविवारपासून त्या ठिकाणी तळ ठोकून आहेत आणि या हत्तीला वाचवण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे.


हे देखील वाचा –

Mumbai Local Disruption : मध्य रेल्वेला धक्का! विक्रोळी – माटुंगादरम्यान रेल्वे रुळाला गेला तडा; प्रवाशांचे मात्र झाले हाल

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या