Karnataka Russian Family Rescue | कर्नाटकमधील गोकर्णजवळील रामतीर्थ टेकडीवरील एका धोकादायक गुहेत रशियन महिला आपल्या दोन लहान मुलींसह राहत असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
गोकर्ण पोलिसांनी जंगलात गस्त घालताना 40 वर्षीय नीना कुटिना आणि तिच्या साडेसहा व चार वर्षांच्या मुलींना शोधून काढले.
कशी उघड झाली घटना?
गोकर्ण पोलिसांची टीम पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रामतीर्थ टेकडीवर गस्त घालत होती. जंगलात तपासणी करताना त्यांना भूस्खलनप्रवण भागात एका गुहेजवळ हालचाल दिसली. तपासात नीना कुटिना आणि तिच्या मुली प्रेमा आणि अमा यांचा गुहेत राहण्याचा थक्क करणारा प्रकार समोर आला.
नीनाने सांगितले की, ती गोव्यातून आध्यात्मिक एकांतासाठी गोकर्णला आली होती. शहरी जीवनापासून दूर ध्यान आणि प्रार्थना करण्यासाठी तिने गुहेत राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा भाग जुलै 2024 मध्ये भूस्खलनग्रस्त झाला असून, विषारी साप आणि इतर वन्यजीव यामुळे तो अत्यंत धोकादायक आहे, ज्यामुळे तिच्या मुलींची सुरक्षितता धोक्यात होती.
पोलिसांनी नीनाचे समुपदेशन करून तिला धोक्याची जाणीव करून दिली. तिच्या विनंतीवरून तिला आणि मुलींना कुमठा तालुक्यातील बांकीकोडला गावातील स्वामी योगरत्न सरस्वती यांच्या आश्रमात हलवण्यात आले. गुहेत हरवलेले तिचे पासपोर्ट आणि व्हिसा कागदपत्रे पोलिस आणि वन विभागाच्या संयुक्त शोधमोहिमेत सापडले.
व्हिसा उल्लंघनाचा खुलासा
तपासात असे समोर आले की, नीना 2017 मध्ये बिझनेस व्हिसावर भारतात आली होती. 2018 मध्ये तिला एक्झिट परमिट मिळाले होते, पण ती नेपाळहून पुन्हा भारतात परतली आणि व्हिसा नियमांचे उल्लंघन करून जास्त काळ राहिली. या उल्लंघनामुळे तिला आणि मुलींना कारवारमधील महिला स्वागत केंद्रात संरक्षणार्थ ठेवण्यात आले आहे.
उत्तरा कन्नडचे पोलीस अधीक्षकांनी बेंगळूरूच्या FRRO सोबत पत्रव्यवहार सुरू केला आहे. लवकरच हे कुटुंब बेंगळूरू FRRO समोर हजर होऊन रशियात प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण करेल.
हे देखील वाचा –