Home / देश-विदेश / kedarnath yatra 2026 : २२ एप्रिलला केदारनाथ मंदिर चे दरवाजे खुले होणार ; उखीमठातून १९ एप्रिलला निघणार पंचमुखी डोली

kedarnath yatra 2026 : २२ एप्रिलला केदारनाथ मंदिर चे दरवाजे खुले होणार ; उखीमठातून १९ एप्रिलला निघणार पंचमुखी डोली

kedarnath yatra 2026 : उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील प्रसिद्ध केदारनाथ मंदिर (Kedarnath temple)याचे दरवाजे यावर्षी २२ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता...

By: Team Navakal
kedarnath yatra 2026
Social + WhatsApp CTA

kedarnath yatra 2026 : उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील प्रसिद्ध केदारनाथ मंदिर (Kedarnath temple)याचे दरवाजे यावर्षी २२ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता भाविकांसाठी उघडले जाणार आहेत. महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिर (Omkareshwar temple) येथे वैदिक विधी (Vedic rituals)आणि पंचांग गणनेनंतर या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आली.यंदा मंदिराचे दरवाजे वृषभ लग्नात उघडले जाणार असून, धार्मिक दृष्ट्या हा मुहूर्त अत्यंत शुभ मानला जातो.

यंदाची यात्रा १० दिवस आधी

मागील वर्षी २ मे २०२५ रोजी केदारनाथ धामचे (Kedarnath Dham) कपाट उघडण्यात आले होते. मात्र, यावर्षी २२ एप्रिलला दरवाजे खुलणार असल्याने भाविकांना सुमारे १० दिवस आधीच बाबा केदारांचे (Baba Kedar)दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे यंदाच्या यात्रेला अधिक उत्साहाचे वातावरण आहे.
प्रशासनाची युद्धपातळीवर तयारी

तारीख जाहीर होताच राज्य शासन, प्रशासन आणि बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर (Badrinath-Kedarnath temple) समितीने तयारीला वेग दिला आहे. पायी मार्गावरील बर्फ हटवणे, रस्त्यांची दुरुस्ती, सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे तसेच यात्रेकरूंसाठी निवास, वैद्यकीय सुविधा आणि इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यंदा यात्रा अधिक सुरक्षित आणि सुव्यवस्थित करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.

भैरवनाथ पूजेनंतर (Bhairavnath)विधींची सुरुवात

कपाट उघडण्याच्या पारंपरिक प्रक्रियेनुसार १८ एप्रिल रोजी भगवान भैरवनाथांची विशेष पूजा-अर्चा केली जाईल. परंपरेनुसार भैरवनाथ हे धामचे क्षेत्रपाल देवता मानले जातात आणि त्यांच्या पूजेनंतरच यात्रेची औपचारिक सुरुवात होते.

पंचमुखी डोलीचा (Panchmukhi Doli) प्रवास

भगवान केदारनाथांची पंचमुखी डोली १९ एप्रिल २०२६ रोजी शीतकालीन गादीस्थळ उखीमठ येथून धामकडे प्रस्थान करेल. त्याच दिवशी डोली फाटा येथे पोहोचेल.

२० एप्रिल रोजी गौरीकुंड येथे रात्रीचा मुक्काम होईल आणि २१ एप्रिल रोजी डोली केदारनाथ धामात दाखल होईल. या पारंपरिक डोली यात्रेदरम्यान भाविक मार्गात दर्शन घेत चालतात. ही यात्रा केदारनाथाच्या आध्यात्मिक परंपरेचा महत्त्वाचा भाग मानली जाते.

२२ एप्रिलला सकाळी ८ वाजता कपाटोद्घाटन

डोली मंदिरात पोहोचल्यानंतर २२ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता शुभ मुहूर्तावर मंदिराचे दरवाजे उघडले जातील. यावेळी वैदिक मंत्रोच्चार, रावल यांची विशेष पूजा आणि पारंपरिक विधी पार पाडल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जाईल. चारधाम यात्रेतील एक महत्त्वाचे केंद्र असलेल्या केदारनाथ धामात यंदाही लाखो भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे.


हे देखील वाचा –

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील लक्ष्मीनारायण मंदिराला पाडकामाची नोटीस; मंदिर स्थलांतराचा मुद्दा तापला

 डोंबिवलीत पहाटे ४.१५ वाजता बेसमेंटमध्ये आग; २९ दुचाकी जळून खाक ; ५ जखमी

३० जूनपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची घोषणा

रिलायन्स रुग्णालयात तेजस ठाकरे यांच्यावर उपचार : उद्धव-रश्मी ठाकरे रुग्णालयात

Web Title:
संबंधित बातम्या