Seven-Star Bungalow – राजधानी दिल्लीतील कथित शिश महलनंतर (Sheesh Mahal) माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) निमंत्रक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांच्यावर भाजपाने नवा आरोप केला आहे.पंजाबमधीलआप सरकारने  (Punjab government)  केजरीवाल यांना चंदिगढमध्ये आलिशान सप्त तारांकित बंगला दिला आहे,असा आरोप भाजपाने केला आहे.तर आपने भाजपाचा आरोप साफ फेटाळून लावला आहे.
भाजपाच्या दिल्ली युनिटने (BJP’s Delhi unit)एक्सवर एक फोटो शेअर केला असून त्यासोबत जी व्यक्ति स्वतःला सर्वसामान्य माणूस म्हणवते त्या व्यक्तिसाठी आणखी एक आलिशान शिशमहल बांधण्यात आला.दिल्लीतील शिश महल सोडवा लागल्यानंतर पंजाबचे ‘सुपर चीफ मिनिस्टर’अरविंदजी केजरीवाल यांना आता त्याहूनही आलिशान बंगला मिळाला, असा बोचरा संदेश लिहिला आहे.
‼️ Big Breaking – आम आदमी का ढोंग करने वाले केजरीवाल ने तैयार करवाया एक और भव्य शीशमहल
— BJP Delhi (@BJP4Delhi) October 31, 2025
दिल्ली का शीश महल ख़ाली होने के बाद पंजाब के Super CM अरविंद केजरीवाल जी ने पंजाब में दिल्ली से भी शानदार शीश महल तैयार करवा लिया है 😳
चंडीगढ़ के सेक्टर 2 में CM कोटे की 2 Acre की आलीशान 7… pic.twitter.com/d3V4W23yRw
भाजपाने शेअर केलेल्या फोटोमध्ये दोन एकरच्या विस्तीर्ण क्षेत्रफळावर उभारण्यात आलेला आलिशान बंगला दिसत आहे.
भाजपाच्या या पोस्टवर आपच्या वतीने तत्काळ प्रत्युत्तर देण्यात आले.भाजपाचा आरोप धादांत खोटा असून हिंमत असेल तर केजरीवाल यांना हा बंगला वितरित करण्यात आल्याचे अधिकृत पत्र दाखवा,असे आव्हान आपने भाजपाला दिले आहे.
हे देखील वाचा –
तटकरेंचा शेवटचा हिशोब चुकता करणार! आमदार दळवींचा इशारा
 
								 
								 
								 
								 
								 
				 
															 
								 
								 
								 
								 
								 
								








