Kolkata Earthquake : कोलकाता आणि आसपासच्या अनेक जिल्ह्यांना भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी हादरवून सोडले. यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आणि लोक भीतीने घरे व कार्यालये सोडून बाहेर धावले.
युरोपीयन-मेडिटेरेनियन सिस्मॉलॉजिकल सेंटर (EMSC) नुसार, या भूकंपाचे केंद्रस्थान बांगलादेशात होते. बांगलादेशमधील घोराशाल परिसराजवळ सकाळी 10.08 वाजता 5.7 तीव्रतेचा भूकंप झाला. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्वे (USGS) नुसार, या भूकंपाचे केंद्रस्थान बांगलादेशातील नारसिंगदीपासून 14 किलोमीटर अंतरावर होते.
या भूकंपापूर्वी, राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या (NCS) माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्येही मध्यम तीव्रतेचे 2 भूकंप झाले होते.
Strong tremors felt across parts of Kolkata, including the Salt Lake IT sector.
— Dr Tapas Pramanick (R G Kar Medical College) (@Rgkar2019Tapas) November 21, 2025
Employees evacuated buildings as precaution.
No major damage reported yet, but authorities urge people to stay alert and avoid using elevators.
Stay safe, Kolkata. 🌍⚠️#Earthquake #Kolkata #SaltLake pic.twitter.com/ZDQm6087wu
दक्षिण बंगालमध्ये जोरदार धक्के
भूकंपाचे धक्के दक्षिण बंगालच्या मोठ्या भागात जाणवले. हे धक्के साधारणपणे सकाळी 10.10 वाजता जाणवले आणि सुमारे 20 सेकंदांपर्यंत राहिले. “पंखे आणि सोफा किमान 7 ते 8 सेकंद हलत होते,” अशी प्रतिक्रिया सॉल्ट लेक सेक्टर 3 येथील एका रहिवाशाने दिली.
सध्या, भूकंपातील नुकसान किंवा जीवितहानी झाल्याची कोणतीही तात्काळ माहिती समोर आलेली नाही. अनेक सोशल मीडिया यूजर्स दावा केला की त्यांना कोलकात्यामध्ये “काही सेकंदांसाठी” पण “शक्तिशाली” भूकंप जाणवला.
कोलकात्यातील अनेक नागरिकांनी सोशल मीडियावर भूकंपाची तीव्रता व्यक्त केली. आणखी एका युजरने सांगितले की धक्के नेहमीपेक्षा जास्त काळ, म्हणजे 30 सेकंदांहून अधिक काळ टिकले आणि ते खूप जोरदार होते. भूकंपाच्या वेळी पंखे आणि भिंतीवरील वस्तू हलतानाचे व्हिडिओ देखील नागरिकांनी सोशल मीडियावर शेअर केले.
हे देखील वाचा – Tesla Model Y किती सुरक्षित? क्रॅश टेस्टमधून समोर आली माहिती









