Home / देश-विदेश / Jammu & Kashmir Rain : जम्मू – काश्मीरच्या कठुआत भूस्खलन ! ७ जणांचा मृत्यू

Jammu & Kashmir Rain : जम्मू – काश्मीरच्या कठुआत भूस्खलन ! ७ जणांचा मृत्यू

Landslide in Kathua

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती (flood)निर्माण झाली आहे . आज पहाटे अनेक ठिकाणी भूस्खलन (landslides) झाले. या दुर्घटनेत पाच लहान मुलांसह सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये जोध घाटी येथील सुरमु दिन (३२), त्यांची दोन मुले फानू (६) व शेडू (५), झुलफून (१५), आणि ताहू (२) तर बगरा येथील रेणू देवी (३९) व तिची मुलगी राधिका (९) यांचा समावेश आहे. तर सहा जखमींना (Six injured)लष्कराच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले.

या दुर्घटनेनंतर प्रशासनाने तात्काळ बचावकार्य सुरु केले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर वैष्णव देवी यात्रा पूर्णपणे थांबवल्याचा निर्णय प्रशासनाने जारी केला.मुसळधार पावसामुळे रात्री नदी-नाल्यांचे पाणी वाढले आणि सखल भागांत पूर आला. राजबागमधील जोध घाटी आणि जंगलोटेतील बगरा गावांमध्ये भूस्खलन झाले. याशिवाय चांगडा गाव, दिलवान-हुटली (Dilwan-Hutli area of Lakhanpur) भागांतही भूस्खलन झाल्याची माहिती आहे. परंतु या परिसरात मोठे नुकसान झालेले नाही. उझ नदीसह इतर नद्यांची पाणीपातळी वाढल्याने प्रशासनाने नागरिकांना सर्तक राहण्याचे आवाहन केले आहे. या दुर्घटनेचा समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनेक कुडाची घरे कोसळलेली दिसतात.


मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Chief Minister Omar Abdullah) यांनी मृतांच्या कुटुंबीयांना आणि घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी (Relief Fund) व राज्य आपत्ती निवारण निधीतून (State Disaster Response Fund.)तत्काळ अनुदान जाहीर केले. यानुसार मृतांच्या कुटुंबियांना २ लाख रुपये, गंभीर जखमींसाठी १ लाख रुपये, किरकोळ जखमींसाठी ५० हजार रुपये तर जी घरे पूर्णपणे नष्ट झाली आहेत त्या घरांसाठी १ लाख रुपये, गंभीर नुकसान झालेल्या घरांसाठी ५० हजार आणि अंशतः नुकसान झालेल्या घरांसाठी २५ रुपये निधी मंजूर केला आहे.


पोलीस व प्रशासनाने (administration)डोंगराळ भागातील लोकांना घरातच राहण्याचा इशारा दिला आहे. ढगफुटीमुळे जम्मू-पठानकोट (Jammu–Pathankot)रेल्वे मार्गावर वाहतूक विस्कळीत झाल्याने काही गाड्या रद्द केल्या तर मंडी मनाली महामार्ग (Mandi–Manali highway)बंद केला आहे. हवामान विभागाने १९ ऑगस्टपर्यंत जम्मू विभागातील जम्मू, रियासी, उधमपूर, राजौरी, पूंछ, सांबा व कठुआ येथे जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. डोडा, किश्तवाड व रामबन (Ramban districts)येथेही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.