Home / देश-विदेश / लेहमध्ये दरड कोसळली; महाडचे पर्यटक अडकले

लेहमध्ये दरड कोसळली; महाडचे पर्यटक अडकले

लेह – लेह-मनाली राष्ट्रीय महामार्गावर (Leh-Manali National Highway) दरड कोसळल्यामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. यामुळे महाडमधील तीन कुटुंबांतील ९...

By: Team Navakal
Landslide in Leh, tourists from Mahad stranded
Social + WhatsApp CTA

लेह – लेह-मनाली राष्ट्रीय महामार्गावर (Leh-Manali National Highway) दरड कोसळल्यामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. यामुळे महाडमधील तीन कुटुंबांतील ९ पर्यटक (Tourist) मागील दोन दिवसांपासून रस्त्यात अडकले आहेत. उणे २ अंश सेल्सिअस तापमानात अन्न, पाणी व निवाऱ्याविना त्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अडकलेल्या पर्यटकांनी प्रशासनाकडे तातडीने मदतीसाठी कळकळीची मागणी केली आहे.

अडकलेल्या पर्यटकांमध्ये महाड येथील अमोल महामुणकर, समीर सावंत, राजेंद्र दरेकर आणि त्यांचे कुटुंबीय यांचा समावेश आहे. पर्यटनासाठी लेहला गेले असताना परतीच्या प्रवासात दरड कोसळल्याने हे सर्वजण महामार्गावरच अडकले. याबाबत अमोल महामुणकर म्हणाले की, येथील हवामान अत्यंत थंड आहे. तापमान उणे २ अंशांवर गेले आहे. आमच्याकडे अन्न, पाणी, औषधे, गरम कपड्यांचा पूर्णतः अभाव आहे. दोन दिवसांपासून आम्ही या बिकट अवस्थेत आहोत.

लेह-मनाली महामार्गावर सतत दरडी कोसळत असल्याने बचावकार्यात अडचणी येत आहेत. खराब हवामानामुळे मदतीच्या प्रयत्नांना मर्यादा येत आहेत. दरड हटवण्याचे काम सुरू असले तरी रस्ता नेमका कधी खुला होईल याबाबत प्रशासनाकडून निश्चित माहिती मिळालेली नाही. या घटनेमुळे महाडमधील अडकलेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. प्रशासनाने तातडीने मदत पोहोचवावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या