Home / क्रीडा / Lionel Messi : मेस्सीच्या भारत दौरच्या व्हिडिओची जोरदार चर्चा; व्हिडिओत राजकारण्यांना वगळले..

Lionel Messi : मेस्सीच्या भारत दौरच्या व्हिडिओची जोरदार चर्चा; व्हिडिओत राजकारण्यांना वगळले..

Lionel Messi : फुटबाॅलचा बेताज राजा अर्जेंटिनाचा विश्विविजेता कॅप्टन लिओनेल मेस्सीचा दौरा भारतात चर्चेचा विषय ठरला. तब्बल १४ वर्षांनी तो...

By: Team Navakal
Lionel Messi
Social + WhatsApp CTA

Lionel Messi : फुटबाॅलचा बेताज राजा अर्जेंटिनाचा विश्विविजेता कॅप्टन लिओनेल मेस्सीचा दौरा भारतात चर्चेचा विषय ठरला. तब्बल १४ वर्षांनी तो भारत दौऱ्यावर आला होता. यावेळी त्याचे कोलकाता, हैदराबाद, मुंबई, दिल्ली या शहरांमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. हजारो चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी स्टेडियमध्ये मोठी गर्दी केली होती.

या बहुचर्चित भारत दौऱ्यानंतर मेस्सीने त्याच्या सोशल मीडिया हँडेलवर व्हिडिओ शेअर करत सगळ्याचे आभार मानले आहेत. त्याने त्या व्हिडिओला गोड असे कॅप्शन देखील दिले आहे. मेस्सीने ‘नमस्ते भारत!’ म्हणत आपला दौरा दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि कोलकाता येथे खूप छान झाला, असे या कॅप्शनमध्ये नमूद केले आहे. त्याने आपल्या दौऱ्यादरम्यान केलेल्या यादगार स्वागतासाठी, उत्कृष्ट आदरातिथ्याबद्दल आणि दाखवलेल्या सर्व प्रेमाबद्दल सगळ्याचे मनापासून आभार मानले आणि भारतातील फुटबॉलचे भविष्य उज्ज्वल असेल, अशी देखील आशा व्यक्त केली.

दरम्यान, मेस्सीने शेअर केलेल्या व्हिडिओत भारतातील कोणत्याच राजकारण्याला जागा दिली नाही. त्याच्या व्हिडिओत केवळ करिना कपूर, सचिन तेंडुलकर आणि उद्योगपती संजीव गोयंका हेच दिसून आले आहेत. मेस्सीच्या या व्हिडिओमध्ये बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि तिची मुले तैमूर अली खान आणि जेह अली खान यांचा देखील समावेश होता. करीना कपूर खान आणि तिच्या मुलांनी मेस्सीची या भारत दौऱ्यात भेट घेतली होती.

शाहरुख खानकडून मेस्सीचे दणक्यात स्वागत
मेस्सीच्या या व्हिडिओमध्ये शाहरुख खानसोबत झालेल्या भेटीचा समावेश मात्र नव्हता. पण, मेस्सी आणि शाहरुख खान यांच्या भेटीचे क्लिप्स दौऱ्यातील प्रमुख क्षण ठरले होते. शाहरुख खानने मेस्सीचे हँडशेक आणि स्माईलसह भारतात स्वागत केले होते. तसेच, शाहरुख खानचा मुलगा अबराम खान, मेस्सीमुळे खूप भारावून गेला असल्याची देखील माहिती आहे.


हे देखील वाचा – Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट! औरंगाबाद खंडपीठाने वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फोटाळला

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या