Home / देश-विदेश / London :धावत्या ट्रेनमध्ये चाकूचा वार; ९ जण गंभीर जखमी..

London :धावत्या ट्रेनमध्ये चाकूचा वार; ९ जण गंभीर जखमी..

London : लंडनला जाणाऱ्या एका धावत्या ट्रेनमध्ये झालेल्या सामूहिक चाकू हल्ल्याची ब्रिटिश पोलिस चौकशी करत आहेत. या हल्ल्यात १० जण...

By: Team Navakal
London
Social + WhatsApp CTA

London : लंडनला जाणाऱ्या एका धावत्या ट्रेनमध्ये झालेल्या सामूहिक चाकू हल्ल्याची ब्रिटिश पोलिस चौकशी करत आहेत. या हल्ल्यात १० जण जखमी झाले असून त्यापैकी नऊ जण गंभीर जखमी आहेत. या संदर्भात दोघांना अटक करण्यात आली आहे.

उत्तर इंग्लंडमधील डोनकास्टर शहर आणि राजधानीतील किंग्ज क्रॉसला जाणाऱ्या ट्रेनमध्ये हा भयानक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे ट्रेन केंब्रिजशायरमधील हंटिंगडन स्टेशनवर थांबावी लागली. या मार्गावर जास्त गर्दी असते. गर्दीच्या वेळीच ही घटना घडली असल्याची माहिती आहे.” पोलिसांनी सांगितले की १० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यापैकी नऊ जणांना “जीवघेण्या दुखापती झाली आहे.

पोलिसांनी सांगितले की स्टेशनवर दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे, तसेच दहशतवादविरोधी पथके तपासात मदत करत असल्याचेही पोलिसांनी सांगितले. संशयितांची ओळख आणि हेतू त्वरित कळू शकले नाहीत.

याबाबत एका प्रत्यक्षदर्शीने माहिती दिली आहे त्यांनी लोकांना “पळा, पळा, एक माणूस अक्षरशः सर्वांना चाकूने मारत आहे” असे ओरडताना ऐकले आणि सुरुवातीला त्यांना वाटले की हे हॅलोविनशी संबंधित विनोद आहे. परंतु त्यानंतर एका व्यक्तीला मोठ्या चाकूसह ट्रेनमध्ये धावताना पाहिलं. त्यांचा हात रक्ताने माखलेला होता त्यानंतर अनेक प्रवासी सैरावैरा धावत होते.

दरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ” हि खुप भयानक” घटना आहे ” हि खूप चिंताजनकबाब आहे” आहे. मी या हल्ल्यात जखमी झालेल्या निरपराध लोकांसोबत आहे.

“माझ्या भावना प्रभावित झालेल्या सर्वांसोबत आहेत आणि आपत्कालीन सेवांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी त्यांचे आभार मानतो,” स्टारमर यांनी एक्सवरील एका निवेदनात म्हटले आहे. आपत्कालीन सेवा आणि पोलिसांनी तातडीने दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी त्याचा आभारी आहे. असेही ते म्हणाले.


हे देखील वाचा –

Raosaheb Danve : रावसाहेब दानवेंच्या नातवावर तब्बल दहा कोटींची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप; शिवम पाटीलच्या अडचणीत वाढ..

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या