Home / देश-विदेश / LPG cylinder : पीएनजी असणार्‍यांना एलपीजी सिलिंडर नाही! केंद्राचा निर्णयदुकानदारांनी चुली पेटवल्या! पण मालक विरोध करू लागले

LPG cylinder : पीएनजी असणार्‍यांना एलपीजी सिलिंडर नाही! केंद्राचा निर्णयदुकानदारांनी चुली पेटवल्या! पण मालक विरोध करू लागले

LPG cylinder : देशातील इंधन पुरवठ्यावर वाढता ताण आणि सबसिडीचा गैरवापर रोखण्यासाठी केंद्र सरकारने गॅस कनेक्शनच्या नियमांमध्ये मोठे बदल केले...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

LPG cylinder : देशातील इंधन पुरवठ्यावर वाढता ताण आणि सबसिडीचा गैरवापर रोखण्यासाठी केंद्र सरकारने गॅस कनेक्शनच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आदेशानुसार ज्या ग्राहकांच्या घरी पाईपलाईनद्वारे गॅस (पीएनजी) पुरवठा होतो, त्यांना घरगुती एलपीजी सिलिंडर वापरता येणार नाही. ज्या दुकानदारांना पीएनजीची सोय नाही आणि व्यावसायिक एलपीजी मिळत नाही त्यांनी चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे. रवा डोसा, भजी, वडे हे मात्र मेन्यू मधून गायब झाले आहेत. चपात्यांचा भाव दोन रुपयांनी वाढला आहे. ही कसरत सुरू असतानाच जी दुकाने भाड्याच्या जागेत आहेत त्या जागा मालकांनी दुकानात चूल पेटवण्यास मनाई केली आहे. त्यामुळे अडचणी संपतच नाहीत अशी स्थिती आहे.


सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार एका घरात पीएनजी आणि एलपीजी अशा दोन्ही सुविधा ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे. ज्या ग्राहकांकडे आधीपासूनच पीएनजी कनेक्शन आहे, त्यांना त्यांचे एलपीजी सिलिंडर तत्काळ परत करावे लागणार आहे.
इतकेच नाही तर अशा ग्राहकांना आता नवीन सिलिंडरचे रिफिल बुकिंग देखील करता येणार नाही. भविष्यातही पीएनजी वापरकर्त्यांना नवीन एलपीजी कनेक्शन घेता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच अशा ग्राहकांना आता नवीन सिलिंडरचे रिफिल बुकिंग करता येणार नाही. भविष्यातही पीएनजी वापरकर्त्यांना नवीन एलपीजी कनेक्शन घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. ज्या घरांमध्ये पाईप गॅसची सुविधा उपलब्ध आहे त्यांनी एलपीजी सिलिंडरचा वापर थांबवावा, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. सरकारने यापूर्वी पुरवठ्याबाबत 9 दिवसांत 3 वेळा नवीन नियम जारी केले आहेत. गेल्या काही दिवसांत गॅस पुरवठ्याबाबत सरकारकडून टप्प्याटप्प्याने काही नियम जारी करण्यात आले आहेत. 6 मार्च रोजी घरगुती एलपीजी बुकिंगसाठी लॉक-इन कालावधी 21 दिवसांचा करण्यात आला. त्यानंतर 9 मार्च रोजी शहरांमध्ये वाढत्या मागणीमुळे हा कालावधी 25 दिवसांपर्यंत वाढविण्यात आला. तर 12 मार्च रोजी ग्रामीण भागात सिलिंडर बूक करण्यामधील अंतर 45 दिवसांचे करण्यात आले.

इस्रायल पंतप्रधान नेतान्याहूचा पाठलाग करून ठार मारू!
इराणने इस्त्रायली पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहूंना ठार मारण्याचा थेट इशारा दिला आहे. इस्रायल पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूचा पाठलाग सुरू ठेवण्याची शपथही घेतली असून, जर बालहत्या करणारा जिवंत असेल तर आम्ही आमच्या सर्व शक्तीनिशी त्याला ठार मारू, असा इशारा इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने दिला आहे. इराणच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईदरम्यान नेतान्याहू यांची हत्या झाल्याचा दावा आधी करण्यात आला होता. मात्र इस्त्रायल पंतप्रधान कार्यालयाने हे वृत्त फेटाळत म्हटले की, ही बातमी खोटी आहे. पंतप्रधान सुरक्षित आहेत.


दरम्यान, इस्रायलवर इराणकडून क्षेपणास्त्र हल्ले सुरूच आहेत. मध्य इस्रायलमधील होलोन शहरावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात दोन जण किरकोळ जखमी झाले. दुबईमध्ये अनेक स्फोट झाले. कुवैत आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ व उत्तर इराकमधील एका रिफायनरीजवळ ड्रोन हल्ला झाला. शोहम परिसरात मोठे नुकसान झाले. इराणने पुन्हा लेबनॉन आणि सिडॉन भागातील रहिवासी इमारतींवर हल्ले केले. इराणच्या प्रवक्त्या फतेमेह यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले की, इराणचा रहिवासी भाग, शाळा, रुग्णालय यावर हल्ले केले जात असून, हजारो नागरिक मृत्युमुखी पडले आहेत तर अनेक जखमी आहेत. इमारती कोसळलेल्या आहेत. इराणचे हे आरोप इस्त्रायल व अमेरिकेने फेटाळले. आज इराणने इराकच्या इस्पाहन शहरावर हल्ला केला. कारखान्यावर पडलेल्या बॉम्ब हल्ल्यात 15 कामगार ठार झाले. आतापर्यंत इस्त्रायलवरील हल्ल्यात 1400 जण ठार झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या