Home / देश-विदेश / गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! बिहारच्या ‘या’ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता

गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! बिहारच्या ‘या’ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता

Maithili Thakur: बिहार विधानसभा निवडणूक 2025 (Bihar Assembly Election 2025) च्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीपूर्वी एक...

By: Team Navakal
Maithili Thakur

Maithili Thakur: बिहार विधानसभा निवडणूक 2025 (Bihar Assembly Election 2025) च्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीपूर्वी एक मोठी राजकीय घडामोड झाली असून, बिहारची प्रसिद्ध लोकगायिका मैथिली ठाकूरने (Maithili Thakur) भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे. बिहार भाजपचे अध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी त्यांना पक्षाची सदस्य्ता दिली.

या पक्षप्रवेशामुळे मैथिली ठाकूर विधानसभा निवडणूक लढवणार हे निश्चित झाले आहे. ती अलीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

Maithili Thakur: कोण आहे मैथिली ठाकूर?

मैथिली ठाकूरचा जन्म 25 जुलै 2000 रोजी झाला. ती मूळच्या बिहारमधील मधुबनी (Madhubani) येथील असली तरी, ती बऱ्याच वर्षांपासून दिल्लीतील नजफगढयेथे राहत आहे. तिचे वडील रमेश ठाकूर हेच तिचे गुरू असून, तेच संगीत शिक्षण देतात. तिच्या आईचे नाव पूजा ठाकूर आहे. मैथिली ठाकूरसा ऋषभआणि अयाची नावाचे दोन भाऊ आहेत.

राजदचे आमदारही भाजपमध्ये

मैथिली ठाकूरसोबतच राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) आमदार भरत बिंद यांनीही आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल म्हणाले की, बिहारचे मतदार पुन्हा एकदा एनडीएचे (NDA) सरकार स्थापन करण्यास तयार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारचा विकास होत आहे.

जयस्वाल यांनी विरोधी पक्षावर टीका केली. ते म्हणाले, “विरोधकांकडे आज विकासाचा कोणताही ठोस मुद्दा नाही. एनडीएने जागा वाटपाची घोषणा सामंजस्याने केली आहे आणि उमेदवारांचीही घोषणा सुरू झाली आहे, त्यामुळे विरोधक हताश झाले आहेत.”

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या