Home / देश-विदेश / ‘मुलगी रात्री 12.30 वाजता बाहेर कशी गेली?’; दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींच्या वक्तव्यामुळे मोठा वाद

‘मुलगी रात्री 12.30 वाजता बाहेर कशी गेली?’; दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींच्या वक्तव्यामुळे मोठा वाद

Mamata Banerjee Rape Case Statement: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी दुर्गापूर येथील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीवरील...

By: Team Navakal
Mamata Banerjee Rape Case Statement

Mamata Banerjee Rape Case Statement: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी दुर्गापूर येथील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीवरील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणावर केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

माध्यमांनी आपल्या शब्दाचा विपर्यास केल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला असला तरी, त्यांच्या वक्तव्यावर भाजपने (BJP) तीव्र टीका करत टीका केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

‘रात्री बाहेर कशा गेल्या?’

ओडिशातील जलेश्वर येथील पीडित विद्यार्थिनी शुक्रवारी रात्री आपल्या मित्रासोबत खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या कॅम्पसबाहेर पडली होती. रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली. यावर प्रतिक्रिया देताना ममता बॅनर्जी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले.

त्या म्हणाल्या, “ती खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिकत होती… सर्व खासगी महाविद्यालयांची जबाबदारी कोणाची आहे? मुलगी रात्री 12.30 वाजता बाहेर कशी गेली?… माझ्या माहितीनुसार, ही घटना जंगल भागात घडली आहे… तपास सुरू आहे.”

या घटनेने मला धक्का बसला असला तरी, खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांची, विशेषत: मुलींची काळजी घेतली पाहिजे आणि त्यांना रात्री बाहेर जाण्याची परवानगी देऊ नये, असेही त्यांनी नमूद केले.

‘माध्यमांनी वक्तव्यांचा विपर्यास केला’

वक्तव्यावर टीका सुरू झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी माध्यमांवर आरोप केला. “माध्यमांनी माझ्या शब्दांचा विपर्यास केला. तुम्ही मला प्रश्न विचारता, मी त्याचे उत्तर देते आणि नंतर तुम्ही त्याचा विपर्यास करता. अशा प्रकारचे राजकारण करू नका…” असे त्या म्हणाल्या.

भाजपने ‘तालिबानी सरकार’ म्हणत केली टीका

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्ष भाजपने जोरदार टीका केली. भाजप आमदार अग्निमित्रा पॉल यांनी बॅनर्जींच्या वक्तव्याला ‘लाजिरवाणे’ आणि ‘प्रतिगामी’ ठरवले. पॉल म्हणाल्या, “अफगाणिस्तानात तालिबानी सरकार आहे, आणि पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार आहे.”

बंगाल भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री सुकंता मुजुमदार यांनी तर या वक्तव्यामुळे ममता बॅनर्जींच्या राजीनाम्याची मागणी केली. “प्रशासनाच्या सर्वोच्च स्तरावर असताना, गृह विभाग स्वतः हाताळत असताना आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिला असूनही, त्यांचे वक्तव्य अत्यंत निंदनीय आणि लाजिरवाणे आहे!” असे मुजुमदार यांनी समाजमाध्यमांवर लिहिले.

हे देखील वाचा – Doctor Assault : प. बंगालात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर पुन्हा अत्याचार ! तिघांना अटक

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या