Marathi Language Viral Video : मराठी अमराठी वाद हा आजकाल सर्रास पाहायला मिळतो पण आता हा वाद झाली थेट एअर इंडियाच्या विमानात. एअर इंडियाच्या कोलकाता ते मुंबई विमानात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून शाब्दिक वादावादी झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हिडिओ कालचा ऑक्टोबरचा असून माही खान यांनी या वादाचा व्हिडिओ शेअऱ केला आहे.
या व्हिडिओत माही खान यांच्यासोबत प्रवास करणारी महिला माही खानला मराठी बोलता येत नाही यावरून सुनावताना दिसत आहे. खान यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये महिला सहप्रवासी त्यांना मराठी भाषेवरून सुनावताना दिसत आहे. ती म्हणते जर तुम्ही मुंबईत जात आहात तर तुम्हाला मराठी यायला पाहिजे असही ती म्हणताना दिसत आहे.
खान यांनी सांगितलं की ज्यावेळी त्यांनी मराठीतून बोलण्यास नकार दिला त्यावेळी त्या महिलेनं मला धमकावायला सुरवात केली. महिला सहप्रवासी म्हणते की तुम्ही मुंबईला जात आहात तर तुम्हाला मराठी बोलता यायला पाहिजे.’ त्या महिलेनं ऑन कॅमेरा तिचं नाव सांगण्यास नकार दिला आहे.
खान यांनी सांगितलं की महिलेच्या चुकीच्या वर्तनाबद्दल त्यांनी तिच्याशी वाद घातला आणि त्यांनी महिलेच्या गैरवर्तनानंतर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना तक्रार केली.. त्यावेळी त्या महिलेनं मी तुम्हाला वाईट वागणूक काय असते हे दाखवतेच अश्या प्रकारची धमकी देखील दिल्याचा दावा खान यांनी केला.
खान यांनी व्हिडीओमध्ये असा देखील दावा केला आहे कि ती मला मी मुंबईला चाललो आहे म्हटल्यावर मराठी बोलता यायला पाहिजे असं ओरडत होती. त्यावर मी हा काय अगाऊपणा आहे असं शांततेत म्हणालो त्यावेळी त्यांनी मी तुम्हाला आगाऊपणा काय असतो हे दाखवतेच असं म्हणत धमकी दिली.
हा वाद केवळ वैयक्तिक नसून वाढत्या असहिष्णुतेचे आणि भाषेच्या आधारे होणाऱ्या भेदभावाचे उदाहरण आहे. व्हिडिओत ते पुढे म्हणतात. मी सर्व काही रेकॉर्ड केलं आहे. हे फक्त माझ्या बाबतीतलं नाही झालं आहे. हा मानसिकतेचा देखील विषय आहे.
हे देखील वाचा –









