Maria Machado and Donald Trump: नोबेल पुरस्कारासाठी(nobel-prize)अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(donald-trump)हे इच्छुक असल्याच्या बातम्या बऱ्याच काळापासून वाऱ्याच्या वेगाने पसरत होत्या. पण आता शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो (Maria Machado) या मिळाला. शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा होताच, डोनाल्ड ट्रम्प(donald-trump)यांचं स्वप्न मात्र तुटलं आहे. आपल्याला शांततेचा नोबल भेटावा अशी त्यांची इच्छा होती, त्यांनी अनेकदा नोबेलवर (nobel-prize) आपला दावा देखील केला आहे, एवढंच नाही तर आपण अनेक युद्ध थांबवल्याचा दावा देखील त्यांनी केला होत. मात्र शांततेच्या नोबेल पुरस्काराच दान काही ट्रम्प यांच्या पदरी पडलं नाही. हुकूमशाहीतून लोकशाहीमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी, शांतंतापूर्ण मार्गाने लढा दिल्याबद्दल २०२५ चा शांतता नोबेल पुरस्कार मारिया यांना जाहीर करण्यात आला आहे.
मारिया कोरिना मचाडो याना हा नोबेल पुरस्कार जाहीर झाल्याने अनेक चर्चाना उधाण आले आहे. यावर त्यांनी ट्विटद्वारे आपलं मत देखील मांडलं आहे. परंतु त्यांच हे वक्तव्य आश्चर्य चकित करणार आहे. त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी लिहल आहे कि व्हेनेझुएलाच्या नागरिकांना त्यांच्या संघर्षासाठी मिळालेली ही प्रेरणा, हि ओळख आहे. आम्ही सगळे विजयाच्या उंबरठ्यावर आहोत. आधीपेक्षाही अधिक स्वातंत्र्य आणि लोकशाही मिळाल्याबद्दल आम्ही राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प, अमेरिका आणि जगातील लोकशाही देशांचे आभारी आहोत. तसेच पुढे त्या म्हणतात व्हेनेझुएलाच्या मुद्द्यावर आमचा उद्देश साधण्यासाठी समर्थनार्थ उभे राहिल्याबद्दल मी हा पुरस्कार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना समर्पित करत आहे.
हे देखील वाचा –