Melania Trump Nobel Peace Prize : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अनेक देशातील युद्ध थांबवण्यासाठी आपण मध्यस्थी केल्याचा दावा करत आहेत. तसेच, ही युद्धं थांबवण्यासाटी नोबेल पुरस्कार मिळायला हवा, अशी उघड इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, आता ट्रम्प यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनाही नोबेल पुरस्कार मिळायला हवा, अशी चर्चा सुरू झाली आहे.
ट्रम्प यांना 2025 च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी अनेक देशांकडून नामांकन मिळाले आहे. यात आता एक मोठी भर पडली आहे. फ्लोरिडाच्या हाऊस रिपब्लिकन प्रतिनिधी ॲना पॉलिनो लूना यांनी दावा केला आहे की फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांनाही या पुरस्कारासाठी नामांकन मिळू शकते.
युक्रेनमधील शांतता करारासाठी त्या एक महत्त्वाचे कारण ठरतील, असे लूना यांचे म्हणणे आहे. रवांडा, इस्रायल, गॅबॉन, अझरबैजान आणि कंबोडिया यांसारख्या राष्ट्रांनी तसेच काही खाजगी व्यक्तींनी आधीच डोनाल्ड ट्रम्प यांचे नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन केले आहे.
मेलानिया ट्रम्प यांनी रशियासोबतच्या चर्चेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असे ॲना पॉलिनो लूना यांनी एका मुलाखतीत सांगितले. त्यांच्या मते, युक्रेनसोबत शांतता करार घडवून आणण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांमध्ये मेलानिया ट्रम्प महत्त्वाची भूमिका बजावतील. नोबेल शांतता पुरस्काराच्या अधिकृत वेबसाइटनुसार, हा पुरस्कार एकाच वेळी तीन व्यक्ती किंवा संस्थांना दिला जाऊ शकतो.
या महिन्याच्या सुरुवातीला, अलास्कामध्ये झालेल्या एका शिखर परिषदेत ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना त्यांच्या पत्नीने लिहिलेले एक पत्र दिले होते. या पत्रात मेलानिया यांनी पुतिन यांना युद्धग्रस्त युक्रेनमधील मुलांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले होते.
दरम्यान, यांनी भारत-पाकिस्तानसह इतर देशातील युद्ध रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा वारंवार केला आहे. तसेच, शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा असे देखील त्यांनी म्हटले आहे. मात्र, आता अचानक मेलानिया ट्रम्प यांच्या नावाची यासाठी चर्चा सुरू झाल्याने नवीन ट्विटस्ट पाहायला मिळत आहे. 2025 च्या नोबेल शांतता पुरस्कार विजेत्याची घोषणा 10 ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
पुणे ते नाशिक प्रवास फक्त 20 मिनिटांत! वाहतूक कोंडी संपवण्यासाठी नवा प्लॅन
‘Trump is dead’ ट्रेंडमुळे सोशल मीडियावर खळबळ, ट्रम्प यांच्या मृत्यूची अफवा कशी पसरली? जाणून घ्या