Home / देश-विदेश / Meloni’s autobiography: मेलोनींचे आत्मचरित्र म्हणजे ‘मन की बात’! मोदींचे गौरवोद्गार

Meloni’s autobiography: मेलोनींचे आत्मचरित्र म्हणजे ‘मन की बात’! मोदींचे गौरवोद्गार

Meloni’s autobiography: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे आत्मचरित्र (Meloni’s autobiography) मेलोनींचे आत्मचरित्र म्हणजे ‘मन की बात’! मोदींचे गौरवोद्गार म्हणजे मन...

By: Team Navakal
Meloni's autobiography
Social + WhatsApp CTA

Meloni’s autobiography: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे आत्मचरित्र (Meloni’s autobiography) मेलोनींचे आत्मचरित्र म्हणजे ‘मन की बात’! मोदींचे गौरवोद्गार म्हणजे मन की बात आहे, असे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. मेलोनी यांच्या आय एम जॉर्जिया – माय रूट्स, माय प्रिन्सिपल्स नामक आत्मचरित्राच्या भारतीय आवृत्तीसाठी पंतप्रधान मोदींनी मनोगत लिहिले आहे.

पंतप्रधान मोदींनी मेलोनी यांच्या आत्मचरित्राचे वर्णन करण्यासाठी मन की बात या आपल्या आकाशवाणीवरील कार्यक्रमाचे नाव वापरले. या पुस्तकात लेखन योगदान देण्याची संधी मिळणे हा मोठा सन्मान असल्याचेही मोदींनी म्हटले. या आत्मचरित्राचे लवकरच भारतात प्रकाशन होणार आहे.

मोदी लिहितात की, मेलोनी या देशभक्त आणि उत्कृष्ट समकालीन नेत्या आहेत. त्यांचे जीवन भारतीय मूल्यांशी जुळणारे आहे आणि ते वाचकांना नक्कीच आवडेल. मेलोनी यांचा सांस्कृतिक वारसा जपण्याचा आणि जगासोबत समान पातळीवर व्यवहार करण्याचा विश्वास यामध्ये भारतीय मूल्यांचे प्रतिबिंब आढळते.

या पुस्तकात त्यांचे खाजगी जीवन, रोममधील बालपण आणि राजकीय प्रवास याबद्दलचे प्रामाणिक अनुभव आहेत. आई, बहीण, आजी-आजोबांच्या प्रभावापासून ते मुलीसोबतचे नाते, मातृत्व, श्रद्धा आणि युरोपबद्दलची त्यांची दृष्टी यावर त्यांनी थेटपणे भाष्य केले आहे. त्यांचे प्रेरणादायक जीवन आणि राजकीय वाटचाल जाणून घेण्यासाठी त्यांच्या आत्मचरित्राला भारतातही चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला आहे.

—————————————————————————————————————————————————-

हे देखील वाचा –

करूरमधील मृतांचा आकडा ४१वर ! थलापतीच्या घरात बॉम्बची धमकी

मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रांगोळी ! अहिल्यानगरात तणाव

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या