Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा अखंड भारताच्या (Akhand Bharat) संकल्पनेवर जोर दिला आहे. मध्य प्रदेशातील सतना येथे बाबा मेहरशाह दरबारच्या नवनिर्मित इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानला थेट ‘घरातून हिसकावून घेतलेली खोली’ अशी उपमा दिली, ज्यामुळे त्यांचे हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरले आहे.
‘ती खोली आपल्याला परत मिळवायची आहे’
पाकिस्तानचा भूभाग हा अविभाजित भारताचा एक भाग असल्याचे स्पष्ट करताना भागवत म्हणाले, “आपले राष्ट्र म्हणजे आपले एक घर आहे. या घराची एक खोली कोणीतरी हिसकावून घेतली. त्या खोलीत टेबल, खुर्ची, कपडे होते, पण ती बळकावण्यात आली. आता ती खोली आपल्याला पुन्हा मिळवायची आहे. अखंड भारत हा आपला संकल्प आहे.”
त्यांनी सिंधी समाजाचा गौरवपूर्ण उल्लेख करत सांगितले की, सिंधी बांधव फाळणीनंतरही पाकिस्तानमध्ये न जाता अखंड भारतात आले. ही सवय नव्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे.
#WATCH | Satna, MP | RSS Chief Mohan Bhagwat says, "Many Sindhi brothers are sitting here. I am very happy. They did not go to Pakistan; they went to undivided India….Circumstances have sent us here from that home because that home and this home are not different. The whole of… pic.twitter.com/CdNaLdzwQc
— ANI (@ANI) October 5, 2025
‘तुटलेला आरसा’ आणि हिंदू म्हणून ओळख
भागवत यांनी देशातील भावनिक ऐक्यावर जोर दिला. ते म्हणाले, ‘आपण सर्वजण एक आहोत, सनातनी आणि हिंदू आहोत. पण एका इंग्रजाने येऊन आम्हाला तुटलेला आरसा दाखवला आणि आमचे विभाजन केले.’
त्यामुळे आता समाजाला एकत्र आणण्यासाठी आपल्या अध्यात्मिक परंपरेचा आधार घेण्याची गरज आहे. ते पुढे म्हणाले की, जे स्वतःला हिंदू मानत नाहीत, त्यांनाही जगात ‘हिंदी’ किंवा ‘हिंदवी’ म्हणून ओळखले जाते, त्यामुळे आपली ओळख हिंदू म्हणूनच आहे आणि हे सत्य स्वीकारले पाहिजे.
प्रत्येक भारतीयाला 3 भाषा अनिवार्य
यावेळी भागवतांनी भाषिक विविधतेवरही महत्त्वाचे मत मांडले. ते म्हणाले, आपल्या देशात भाषा अनेक असल्या तरी भाव एकच असतो. सर्व भारतीय भाषा या राष्ट्रीय भाषा आहेत आणि भाषिक विविधता हा आपल्या एकतेचा श्रृंगार आहे. त्यांनी प्रत्येक नागरिकाला घरातली भाषा, राज्याची भाषा आणि राष्ट्राची भाषा या किमान तीन भाषा येणे आवश्यक असल्याचे सांगितले.
हे देखील वाचा – फोनचा चार्जर बनला महत्त्वाचा पुरावा! पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील आरोपींच्या साथीदाराला ‘अशी’ झाली अटक