Monkey Repellent Job India : दिल्ली विधानसभा परिसरात माकडांच्या वारंवार होणाऱ्या घुसखोरी आणि उपद्रवाचा प्रश्न प्रशासनासाठी मोठा आव्हान ठरत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी विधानसभा प्रशासनाने एक अनोखी आणि प्रभावी युक्ती शोधली आहे. भविष्यात, माकडांना परिसरातून पळवण्यासाठी वानरांचा आवाज नक्कल करणाऱ्या व्यक्तींना तैनात करण्याची योजना लागू केली जाणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) यासाठी वानरांचा आवाज काढणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खुली निविदा जाहीर केली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, यापूर्वीही अशा तज्ज्ञ कर्मचाऱ्यांचा कार्यकाल झाला होता; मात्र त्यांचा करार संपल्याने आता नवीन नेमणूक आवश्यक ठरली आहे.
नवीन योजनेनुसार, हे प्रशिक्षित कर्मचारी कामकाजाच्या दिवशी तसेच शनिवारी विधानसभा परिसरात तैनात राहतील. प्रत्येक कर्मचाऱ्याची शिफ्ट आठ तासांची असेल. या कर्मचार्यांनी वानरांचा आवाज नक्कल करून परिसरातील माकडांना दूर ठेवण्याचे काम करणे अपेक्षित आहे.
विशेष बाब म्हणजे, या तज्ज्ञ कर्मचाऱ्यांसोबत वास्तविक वानरही नेण्याचे ठरले आहे, जे माकडांवर नियंत्रण ठेवण्यास अधिक प्रभावी ठरेल. प्रशासनाचे म्हणणे आहे की, ही योजना परिसरातील सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि माकडांमुळे होणाऱ्या उपद्रवाला टाळण्यासाठी एक नवीन उपाय आहे.
या योजनेतून अपेक्षित आहे की, माकडांच्या घुसखोरीमुळे उद्भवणाऱ्या धोका आणि अडचणी कमी होतील, तसेच विधानसभा परिसरात नागरिक आणि कर्मचार्यांचे सुरक्षित वातावरण सुनिश्चित होईल.
हे देखील वाचा – केंद्र सरकारचा ‘X’ प्लॅटफॉर्मला 72 तासांचा अल्टीमेटम! Grok AI द्वारे अश्लील फोटो बनवल्याने कारवाईचा बडगा









