Monkey Viral Video : प्रयागराजमध्ये माकडांनी चांगला धुमाकूळ घातलेला एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर चांगलाच वायरल होत आहे. सोमवारी, प्रयागराज सोराव तहसीलमध्ये, एका माकडाने झाडावरून ५०० रुपयांच्या नोटांचा भरगोस पाऊस पडायला सुरुवात केली. पैसे पडताना पाहून तेथील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि नोटा गोळा करण्यास सुरुवात केली. ५०० रुपयांच्या नोटांचा गठ्ठा घेऊन त्यांना झाडावर बसलेले एक माकड दिसले. लोकांनी हालचाल केल्यावर ते झाडावर माकड आणखी वर चढले.
सोराव तहसीलमधील आझाद सभागृहासमोर एका तरुणाने त्याची बाईक काही काळासाठी पार्क केली होती. तो नोंदणीच्या कामासाठी तिथे आला होता. त्याने बाईकच्या ट्रंकमध्ये काही पैसे ठेवले होते. त्याचवेळी एक माकड तिकडे आला. त्याने ट्रंक उघडली आणि त्यात सगळं सामान बाहेर काढलं. मग, तो एक बॅग घेऊन जवळच्या पिंपळाच्या झाडावर जाऊन बसला.

त्याला बॅग घेऊन पळून जाताना पाहून काही लोकांनी आरडाओरडा देखील केला. गोंधळ ऐकून माकड बिथरले आणि अधिक वर चढले. त्याने पॉलिथीन बॅगमधून पैशांचे बंडल काढले, आणि रबर बँड तोडले आणि पैसे झाडावरून फेकु लागला.
माकडाकडून पैसे घेण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न..
या घटनेने बाईक मालकाला चांगलाच धक्का बसला. त्याने माकडाला घाबरवण्याचा आणि आपले पैसे परत मिळवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण माकड पैसे सोडत नव्हते. त्या तरुणाने इतर काही लोकांसह एक देखावा केला आणि विटा आणि दगडांनी माकडाला घाबरवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही फायदा झाला नाही.
हे देखील वाचा –
Farmers Loss : फुलांचे उत्पादन घटले; फुलांच्या शेतीतून उत्पादन खर्चही निघत नाही..