Mount Everest Trekkers Stranded: माऊंट एव्हरेस्ट (Mount Everest) परिसरात आलेल्या भीषण हिमवादळामुळे जवळपास 1,000 ट्रेकर्स अडकल्याची माहिती समोर समोर आली आहे. हिमालयीन प्रदेशात ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या असामान्य बर्फवृष्टीमुळे आणि पावसामुळे अनेक ट्रेकर्स सुरक्षित स्थळी पोहोचू शकले नाहीत.
बचावकार्य आणि ट्रेकर्सची सुटका
रिपोर्टनुसार, रविवारपर्यंत 350 ट्रेकर्सना बचाव पथकांनी मार्गदर्शन करून क्यूडांग या छोट्या वस्तीत सुरक्षित आणले आहे. उर्वरित 200 हून अधिक ट्रेकर्सशी संपर्क साधण्यात यश आले आहे. या भागात सुमारे 1,000 लोक अडकले होते. त्यांना मदत करण्यासाठी शेकडो स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथकांना तैनात करण्यात आले होते.
Hundreds of trekkers stranded by a sudden blizzard near Mount Everest were rescued and they reached the township of Qudang safely https://t.co/3GqKyh59Tw pic.twitter.com/WQSIS0tlA4
— Reuters (@Reuters) October 6, 2025
ऑक्टोबरमध्ये असामान्य हवामान
ऑक्टोबर महिन्यात हवामान साधारणपणे स्वच्छ असते, परंतु यावर्षी परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. हिमवादळामुळे आकाश ढगाळ झाले असून, ट्रेकर्सना गुडघ्यापर्यंतच्या बर्फातून आणि सोसाट्याच्या वाऱ्यातून प्रवास करावा लागला.
क्यूडांग येथे पोहोचलेल्या एका ट्रेकरच्या म्हणण्यानुसार, “पर्वतांमध्ये खूप ओलावा आणि थंडी होती. त्यामुळे हायपोथर्मियाचा (Hypothermia) धोका खूप जास्त होता.” या ट्रेकरने सांगितले की, यावर्षी हवामान सामान्य नाहीये आणि त्याच्या गाईडनेही ऑक्टोबरमध्ये इतके अति टोकाचे हवामान कधीच पाहिले नसल्याचे सांगितले.
बर्फवृष्टीची सुरुवात आणि कारण
दोन दिवसांपूर्वी गिर्यारोहकांसाठी प्रसिद्ध असलेल्या एव्हरेस्टच्या पूर्व उतारावर जोरदार बर्फवृष्टी सुरू झाली आणि तिची तीव्रता वाढत गेली. ही दरी सरासरी 4,200 मीटर (13,800 फूट) उंचीवर आहे.
चीनमध्ये सुरू असलेल्या आठ दिवसांच्या राष्ट्रीय सुट्टीचा फायदा घेत ट्रेकर्सची गर्दी थोडी वाढली होती. ही सततची बर्फवृष्टी नेपाळ आणि भारतातील काही भागांत झालेल्या मुसळधार पावसाशी जुळणारी आहे, ज्यामुळे त्या भागांत भूस्खलन आणि अचानक पूर येऊन अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.
हे देखील वाचा – टॉस फिक्सिंग? भारत-पाकिस्तान सामन्यात नक्की काय घडले? मॅच रेफरीकडून मोठी चूक