Home / देश-विदेश / विक्रमी ‘गुरुदक्षिणा’! मुकेश अंबानींने ‘या’ संस्थेला दिले 151 कोटींचे दान, कारण आहे खास

विक्रमी ‘गुरुदक्षिणा’! मुकेश अंबानींने ‘या’ संस्थेला दिले 151 कोटींचे दान, कारण आहे खास

Mukesh Ambani Philanthropy | रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) संस्थला 151 कोटी रुपयांचे...

By: Team Navakal
Mukesh Ambani Philanthropy
Social + WhatsApp CTA

Mukesh Ambani Philanthropy | रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) संस्थला 151 कोटी रुपयांचे बिनशर्त अनुदान जाहीर केले आहे. याच संस्थेतून त्यांनी 1970 च्या दशकात पदवी घेतली होती हे योगदान त्यांनी ‘गुरुदक्षिणा’ म्हणून समर्पित केले.

मुकेश अंबानी यांचा ICT संस्थेशी खोल भावनिक संबंध आहे. ते ‘युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’ (UDCT) या नावाने परिचित असताना येथे शिकले होते.मुकेश अंबानी यांनी आयसीटीमध्ये (तत्कालीन युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी – UDCT) तब्बल तीन तास घालवले. प्राध्यापक एम. एम. शर्मा यांच्या ‘डिव्हाइन सायंटिस्ट’ या चरित्राच्या प्रकाशन सोहळ्यासाठी ते उपस्थित होते.

यावेळी अंबानींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्राध्यापक शर्मांनी युडीसीटीमध्ये दिलेले पहिले व्याख्यान कसे त्यांना प्रेरणादायी ठरले, याची आठवण त्यांनी सांगितली. तसेच, प्रा. शर्मा यांनी नंतर भारताच्या आर्थिक सुधारणांचे एक शिल्पकार म्हणून कशी भूमिका बजावली, हेही त्यांनी नमूद केले. त्यांनी सांगितले की, “प्रा. शर्मा हे फक्त वैज्ञानिक नव्हते, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचे एक शांत पण प्रभावी शिल्पकार होते.”

अंबानी म्हणाले, “माझे वडील धीरुभाई अंबानी यांच्यासारखेच, प्रा. शर्मांनाही भारताला दुर्लभतापासून जागतिक नेतृत्वाकडे नेताना विज्ञान आणि खाजगी उद्योजकतेच्या भागीदारीवर विश्वास होता.”

मुकेश अंबानी यांनी ICT ला हे बिनशर्त अनुदान देताना स्पष्टपणे सांगितले की, “प्रा. शर्मा जेव्हा काही सांगतात, तेव्हा आम्ही विचार न करता ते ऐकतो. त्यांनी सांगितले की मला आयसीटीसाठी काही मोठं करावं लागेल, आणि हे योगदान त्यांच्याच सन्मानासाठी आहे.”

Web Title:
संबंधित बातम्या