Kerala high court– मुस्लिम व्यक्तीला आपल्या दुसऱ्या पत्नीच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी आहे म्हणून पहिल्या पत्नीला पोटगी नाकारता येणार नाही. या व्यक्तीने दुसरा विवाह केला तरी पहिल्या पत्नीच्या पालनपोषणाची जबाबदारी त्याच्यावर आहे. असा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिला. कुराणाच्या ज्या वचनात दुसऱ्या विवाहाची परवानगी आहे.त्यात दोन्ही पत्नींचे पालनपोषणही अंतर्भूत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
केरळ उच्च न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या एका प्रकरणात मुस्लिम पतीने दावा केला होती की, त्याला दुसऱ्या पत्नीचे व मुलांचे पालनपोषण करायचे असल्यामुळे तो पहिल्या पत्नीला पोटगी देऊ शकत नाही. त्यावर न्या. कौसर एडेप्पागथ यांनी म्हटले की, जर एखाद्या मुस्लिम व्यक्तीला दुसरे लग्न करायचे असेल तर त्याने हे सुनिश्चित केले पाहिजे की तो दोन्ही पत्नीची जबाबदारी घेईल. मुस्लिम पर्सनल लॉ एका पेक्षा अधिक विवाह करण्याची परवानगी देत नाही. भारतात शरियत व पर्सनल लॉ या दोन्हींच्या दृष्टीने दुसऱ्या विवाहाला केवळ काही विशेष स्थितीमध्येच परवानगी देता येते. पतीने दोन्ही पत्नींना योग्य वागणूक दिली पाहिजे. कुराणच्या एका आयतेनुसार सर्व पत्नींबरोबर न्याय करता येत नसेल तर केवळ एकच विवाह केला पाहिजे.
याचा अर्थ दुसरा विवाह केला तरी सर्व पत्नींना समान वागणूक दिली पाहिजे. पतीने दुसरे लग्न केल्यामुळे तिला वेगळे राहावे लागत आहे. त्यामुळे तिला निर्वाहभत्ता दिलाच पाहिजे. २०१६ साली एका मुस्लिम पत्नीला कौटुंबिक न्यायालयाने पोटगी देण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला पतीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सुनावणी करताना केरळ उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवत तो कायम केला आहे.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
‘भैय्या म्हणू नका’ चालकाने चक्क टॅक्सीमध्ये बोर्ड लावला ! बंगळुरू शहरातील प्रकार
आम्ही रामाचे अनुयायी आहोत लंका तर भरत पेटवणार आहे!मुख्यमंत्री फडणवीसांचा शिंदेंवर पलटवार









