Nano Technology : भारत-रशियन (Russian)संशोधन सहकार्य अंतर्गत ताजमहालचा (Taj Mahal)फिकट रंग पुनरुज्जीवन करण्याच्या मोहिमेला वेग आला असून पिवळ्या रंगाच्या संगमरवरासाठी (yellowing marble) नॅनो मटेरियल तंत्राचे (nano-material technology) काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या तंत्राने करण्यात येत असलेल्या कामाचे परिणाम सकारात्मक दिसत असून संशोधकांना विश्वास आहे की या प्रकल्पासाठी स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य करारानुसार पुढील तीन वर्षांत जागतिक वारसा संरचनेचा संपूर्ण संगमरवरी पृष्ठभाग पुनर्जीवित होईल.
आतापर्यंतच्या संशोधनात, शास्त्रज्ञांना असे आढळून आले की स्मारकाच्या संगमरवरी फरशीवर (Flooring) सर्वात जास्त परिणाम झालाय परिणामी, भारतीय हवामानाच्या परिस्थितीत नॅनो मटेरियलची प्रभाविकता तपासण्यासाठी प्रथम जमिनीवर प्रयोग करण्यात आले. या प्रकल्पाचे नेतृत्व एएमयूच्या संग्रहालयशास्त्र विभागाचे अध्यक्ष प्रा. अब्दुर रहीम (Prof. Abdur Rahim), रशियन शास्त्रज्ञ पीटर आणि एएमयू ( Aligarh Muslim University)अभ्यासक यांच्यासह करत आहेत. प्रा. अब्दुर रहीम यांच्या मते, बदलती हवामान परिस्थिती, सूर्यप्रकाश, धूळ (Dust) आणि वाढत्या प्रदूषण पातळीच्या दीर्घ संपर्कामुळे ताजमहालच्या संगमरवराची (Taj Mahal’s marble)नैसर्गिक चमक हळूहळू कमी होत आहे.
हे देखील वाचा –
आयपीएल लिलावात पैशांचा पाऊस! अनकॅप्ड खेळाडू मालामाल; पाहा संघांनी कोणत्या खेळाडूंना खरेदी केले?
संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट! औरंगाबाद खंडपीठाने वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फोटाळला









