Narendra Modi Croatia Visit| क्रोएशियाकडून मोदींना लॅटिनमधील पहिला संस्कृत व्याकरण ग्रंथ भेट

Narendra Modi recieve gift in Croatia Visit

झाग्रेब – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या क्रोएशिया दौर्‍यादरम्यान(Narendra Modi Croatia Visit )क्रोएशियाचे पंतप्रधान आंद्रे प्लेंकोविच (Croatia PM Andrej Plenković) यांनी मोदींना १७९० मध्ये प्रकाशित झालेल्या पहिल्या संस्कृत व्याकरण या ग्रंथाची लॅटिन (Latin) भाषेतील पुनर्मुद्रित प्रत भेट दिली.


हा ग्रंथ प्रख्यात क्रोएशियन वैज्ञानिक, मिशनरी आणि विद्वान फिलिप वेझ्डिन (scholar Philip Wezhdin) (१७४८–१८०६) यांनी लिहिला असून, हे लॅटिन भाषेतील संस्कृत व्याकरणावरील पहिले पुस्तक मानले जाते. वेझ्डिन हे पहिले युरोपीय विद्वान होते, ज्यांनी भारतात येऊन संस्कृत भाषेचा सखोल अभ्यास केला. त्यांनी केरळमधील हस्तलिखितांचे बारकाईने निरीक्षण करून अभ्यासक्रम तयार केला होता.

याबाबत पंतप्रधान प्लेंकोविच यांनी एक्स पोस्ट करत म्हटले की, हा ग्रंथ भारत-क्रोएशिया यांच्यातील ऐतिहासिक सहकार्याचे प्रतीक आहे. वेझ्डिन यांचा भारतातील अभ्यास आजही दोन्ही देशांच्या मैत्रीचे स्मारक आहे.

पंतप्रधान मोदींनीही या अनमोल भेटीबद्दल प्लेंकोविच यांचे मनःपूर्वक आभार मानले. या अनमोल भेटीसाठी आपले मन:पूर्वक आभार. हे भारत आणि क्रोएशियामधील दीर्घकालीन बौद्धिक आणि सांस्कृतिक नात्यांचे विलक्षण प्रतीक आहे,असे मोदींनी एक्स पोस्टमध्ये म्हटले.

या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनीही क्रोएशियन राष्ट्राध्यक्ष झोरान मिलानोविच (Croatian President Zoran Milanovic) आणि पंतप्रधान प्लेंकोविच यांना भारतीय संस्कृतीचे प्रतीक म्हणून खास भेटवस्तू दिल्या. राष्ट्राध्यक्ष मिलानोविच यांना ओडिशाच्या प्राचीन पटचित्र (Pattachitra)शैलीतील हस्तनिर्मित चित्र भेट देण्यात आले, त्यात पौराणिक कथा आणि देवतांची चित्ररचना असते. तर प्लेंकोविच यांना भारतीय पारंपरिक कलेचे प्रतीक मानली जाणारी चांदीच्या आकर्षक कंदीलदिव्यांची जोडी भेट दिली.