आज (२ एप्रिल २०२६) पहाटे ३:५४ वाजता, नासाची Artemis II मोहीम चंद्राकडे अमेरिकेतील फ्लोरिडा येथील Kennedy Space Centerमधून झेपावली. पाच दशकांहून अधिक काळानंतर चंद्राकडे जाणारी ही पहिली मानवी मोहीम ठरली आहे. प्रक्षेपित झालेली ही मोहीम, १९७२ मध्ये Apollo 17 मोहीम संपल्यानंतर अंतराळवीरांनी पृथ्वीच्या कक्षेबाहेर केलेला पहिला प्रवास दर्शवते. २० जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँग, बझ आल्ड्रिन आणि मायकल कॉलिन्स यांनी चंद्रावर पहिला प्रवास केल्यापासून आज २०,७१० दिवस झाले आहेत.
Artemis II यशस्वी झाल्यास, अपोलो युगानंतर मानवाने खोल अंतराळात केलेल्या संशोधनाला पुन्हा सुरुवात होईल.
या प्रवासात चार सदस्य आहेत. रीड वाईजमन हे मोहिमेचे कमांडर आहेत, तर व्हिक्टर ग्लोव्हर हे पायलट आणि चंद्रावर प्रवास करणारे पहिले आफ्रिकन-अमेरिकन आहेत. क्रिस्टिना कोच चंद्राच्या कक्षेकडे प्रवास करणारी पहिली महिला ठरतील, आणि Canadian Space Agencyचे जेरेमी हॅन्सेन हे चंद्रावर जाणारे पहिले कॅनेडियन प्रवासी आहेत. १० दिवसांच्या या चंद्र मोहिमेत अंतराळवीर चंद्राच्या पलीकडच्या बाजूला सुमारे ७,४०० किमी अंतरावर जातील, पृथ्वीपासून ४,००,००० किलोमीटर दूर, जे अपोलो मोहिमांपेक्षाही अधिक आहे.
ही मोहीम का आखण्यात आली
व्यापक Artemis कार्यक्रमाची रचना मानवांना चंद्रावर परत नेण्यासाठी आणि तिथे कायमस्वरूपी वास्तव्य स्थापित करण्यासाठी केली आहे. आजची मोहीम २०२२ मधील मानवरहित Artemis चाचणी उड्डाणानंतरची आहे. या चंद्रयात्रेत खालील बाबींची वैज्ञानिकदृष्ट्या तपासणी केली जाईल:
- अंतराळातील जीवनासाठी आधार.
- खोल अंतराळातील दिशादर्शन आणि दळणवळण प्रणाली.
- चंद्राभोवती मानवांना सुरक्षितपणे फिरवण्याच्या Orion moduleच्या क्षमतेची पडताळणी करणे.
- अंतराळयानाच्या manual संचालनाचा आणि भविष्यातील docking प्रक्रियांचा सराव करणे.
- भविष्यातील मोहिमांसाठी आवश्यक असलेला कार्यान्वयन data गोळा करणे.
प्रक्षेपण आणि उड्डाण
या मोहिमेसाठी नासाने ‘स्पेस लाँच सिस्टम’ (SLS) चा वापर केला आहे. ही आतापर्यंत तयार करण्यात आलेल्या सर्वात शक्तिशाली रॉकेट्सपैकी एक आहे; उड्डाणाच्या वेळी हे रॉकेट ३९.९ लाख पौंडांची ‘थ्रस्ट’ (धक्का) निर्माण करते. याला चार मुख्य इंजिने आणि दोन ‘सॉलिड रॉकेट बूस्टर्स’द्वारे गती दिली जाते, जे काही मिनिटांनंतर रॉकेटपासून वेगळे होतात.
अंतराळवीरांनी ‘ओरायन’ (Orion) अंतराळयानातून प्रवास केला. चंद्रयान मोहिमांप्रमाणेच, चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यापूर्वी हे यान सर्वप्रथम पृथ्वीची परिक्रमा करेल. ओरायन सुमारे १० दिवसांत पृथ्वीवर परत येईल.
Artemis II प्रक्षेपण क्रमाची कालरेखा
T-१० मिनिटे
- Kennedy Space Center Launch Complex39 B येथे अंतिम स्वयंचलित प्रक्षेपण क्रम सुरू झाला.
- रॉकेट प्रणाली जमिनीवरील नियंत्रणावरून onboard computerवर हस्तांतरित झाली.
- Liquid hydrogen आणि liquid oxygen असलेल्या टाक्यांमध्ये दाब भरण्यात आला.
T-२ मिनिटे
- Navigation, propulsion आणि फ्लाइट संगणकांची अंतिम तपासणी.
- Orion अंतर्गत ऊर्जेवर (internal power) स्विच झाले.
T-१० सेकंद
इंजिनच्या आसपास स्फोटक वायू जमा होऊ नये म्हणून hydrogen burn-off igniters सक्रिय करण्यात आले.
T-६ सेकंद
SLS Core Stageवरील चार RS-25 engines एकामागून एक प्रज्वलित झाले.
T-०: उड्डाण
- दोन प्रचंड solid rocket booster प्रज्वलित झाले.
- Artemis II ने उड्डाण घेतले – पहाटे ३:५४ (भारतीय प्रमाणवेळ)
T+२ मिनिटे
Solid rocket booster वेगळे झाले आणि अटलांटिक महासागरात कोसळले.
T+८ मिनिटे
- Core Stageची इंजिने बंद झाली.
- Core Stage रॉकेटपासून वेगळा झाला.
T+१२ मिनिटे
‘Interim Cryogenic Propulsion Stage’ (ICPS) ने ओरियनला पृथ्वीभोवती ‘parking orbit’मध्ये स्थापित केले.
T+९० मिनिटे
ICPS ने ‘trans-lunar injection’ (TLI) प्रक्रिया पार पाडली, ज्याद्वारे ओरियन आणि त्याच्या क्रूला ‘free-return trajectiory’ने चंद्राच्या दिशेने पाठवण्यात आले.
अंतराळवीर चंद्रावर न उतरता त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालतील. ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडील प्रदेशाचे छायाचित्रण करतील. त्यानंतर, प्रक्षेपणापासून साधारण दहा दिवसांनी, हे अंतराळयान पृथ्वीवर परत येईल आणि पॅसिफिक महासागरात उतरेल.
मानवतेच्या चंद्रावरील रोमांचक पुनरागमनाविषयीच्या अद्यतनांसाठी आम्हाला फॉलो करा!









