Home / देश-विदेश / Artemis II: १९७२ नंतर पुन्हा मानवी चांद्रमोहीम ६ फेब्रुवारीला यानाचे उड्डाण होणार

Artemis II: १९७२ नंतर पुन्हा मानवी चांद्रमोहीम ६ फेब्रुवारीला यानाचे उड्डाण होणार

Artemis II: १९६९मध्ये अपोलो-१७ (Apollo-17) यानाने मानवाने चंद्रावर पहिल्यांदा पाऊल ठेवले होते. मानवाचे हे छोटेसे पाऊल मानवजातीसाठी मोठी झेप ठरले...

By: Team Navakal
Artemis II
Social + WhatsApp CTA

Artemis II: १९६९मध्ये अपोलो-१७ (Apollo-17) यानाने मानवाने चंद्रावर पहिल्यांदा पाऊल ठेवले होते. मानवाचे हे छोटेसे पाऊल मानवजातीसाठी मोठी झेप ठरले होते. त्याला तब्बल ५० वर्षांहून अधिक काळ उलटल्यानंतर आता मानव पुन्हा चंद्रावर जाण्याच्या तयारीत आहे. चंद्राजवळ जाणारी आर्टेमिस-२ (Artemis II) नावाची मानवयुक्त मोहीम येत्या ६ फेब्रुवारी रोजी राबवली जाणार असून यासाठी पहिले चाचणी राॅकेट तयार झाले आहे. आज ते फ्लोरिडातील केप कॅनव्हेरल येथे प्रक्षेपण केंद्रावर नेण्यात आले. मात्र हे यान चंद्रावर उतरणार नाही, ते केवळ चंद्राचे निरीक्षण करणार आहे. त्यानंतर आर्टेमिस ३ हे चंद्रावर उतरणार आहे, त्यांची ही तयारी आहे.

सुमारे १२ तासांच्या कालावधीत ९८ मीटर उंच रॉकेट असेंब्ली बिल्डिंगमधून सुमारे साडे सहा कि.मी. अंतरावर असलेल्या लाँच पॅडकडे उभ्या अवस्थेत नेण्यात आले. हे रॉकेट स्पेस लॉन्च सिस्टम म्हणून ओळखले जाते आणि ते आर्टेमिस-२ मोहिमेसाठी वापरले जाणार आहे. १७ जानेवारी रोजी सायं. ५.३४ वाजता असेंब्ली बिल्डिंगमधून रॉकेटची यात्रा सुरू झाली आणि १८ जानेवारी रोजी सकाळी ५.१२ वाजता ते केनेडी स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅड ३९ बी येथे पोहोचले. हे रॉकेट ताशी १.३ किमी इतक्या मंद गतीने प्रक्षेपण स्थळी नेण्यात आल्यानंतर आता नासा त्याची अंतिम तपासणी आणि चाचण्या करणार आहे. नासा प्रथम वेट ड्रेस रिहर्सल करणार आहे. ही महत्त्वाची चाचणी असून यात इंधन भरण्याची प्रक्रिया आणि काउंटडाउनची चाचणी केली जाते. यामुळे सर्व प्रणाली योग्यरित्या कार्यरत आहेत की नाही, हे कळते.

नासाच्या माहितीनुसार, सर्व तयारी वेळेत पूर्ण झाल्यास लवकरात लवकर म्हणजे तारीख ६ फेब्रुवारी रोजी प्रक्षेपण केले जाईल. अंतराळवीर रीड वाईसमन, व्हिक्टर ग्लोव्हर, क्रिस्टिना कोक आणि कॅनेडियन अंतराळवीर जेरेमी हॅन्सन यांचा मोहिमेत सहभागी होणार आहेत. चंद्राच्या दूरच्या बाजूभोवती भ्रमण करत असताना अंतराळवीरांना चंद्राचे निरीक्षण, छायाचित्रे आणि त्याच्या भूगर्भशास्त्राचा अभ्यास करण्याकरिता तीन तास मिळणार आहेत. ही मोहीम भविष्यातील चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या मोहिमेची तयारी करण्यात मदत करेल.

अंतराळयानाच्या ज्या भागात बसून अंतराळवीर प्रवास करतील तो भाग जर्मनीमधील ब्रेमेन येथे बनवला गेला आहे. १० दिवसांच्या मोहिमेत अंतराळवीर पहिले दोन दिवस पृथ्वीभोवती भ्रमण करतील. या मोहिमेतून अंतराळवीर अवकाशात सर्वात जास्त अंतर कापणार आहेत. आर्टेमिस- २ च्या मोहिमेत अंतराळवीर चंद्रावर उतरणार नाहीत. अंतराळवीर तीन तासांत केवळ चंद्राचे निरीक्षण करणार आहेत.. यात ते चंद्राचे भूगोल अभ्यासतील, छायाचित्रे घेतील. ही मोहिम भविष्यातील चंद्रावर लँडिंगसाठी असणाऱ्या आर्टेमिस-३ मोहिमेसाठी पायाभूत ठरणार आहे. अर्टेमिस-३ मोहीम २०२७ -२०२८ मध्ये पार पडेल.

चंद्रावर आतापर्यंत पाऊल ठेवलेले अंतराळ वीर

नील आर्मस्ट्राँग हे नाव आपल्या सर्वांनाच परिचित आहे. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव म्हणून ते मानवी इतिहासात अमर झाले आहेत. परंतु नील आर्मस्ट्राँगव्यतिरिक्त आणखी ११ जणांनी आतापर्यंत प्रत्यक्ष चंद्रावर पाऊल ठेवले आहे. हे सर्व अंतराळवीर नासाच्या मोहिमांद्वारे अमेरिकेतून पाठवले गेले, म्हणजेच अद्याप इतर कोणत्याही देशाला चंद्रावर मानव पाठवण्यात यश आलेले नाही.

नासाने १९६९ ते १९७२ या कालावधीत एकूण सहा यशस्वी अपोलो मोहिमा राबवल्या, ज्यांतून हे १२ अंतराळवीर चंद्रावर उतरण्यात यशस्वी झाले. या मोहिमांना अपोलो 11 ते अपोलो 17 असे नामकरण करण्यात आले, ज्या सात मोहिमांपैकी अपोलो 13 अपयशी ठरली होती. या मोहिमांमध्ये एकूण २४ अंतराळवीर सहभागी झाले, परंतु फक्त १२ जणच प्रत्यक्ष चंद्रावर उतरले. चंद्रावर उतरणाऱ्या या अंतराळवीरांनी केवळ चंद्रावर पाऊल टाकले नाही, तर माती आणि खडकांचे नमुनेही गोळा केले, जे आजही जगभरातील प्रयोगशाळांमध्ये वैज्ञानिक अभ्यासासाठी वापरले जात आहेत. यामुळे चंद्राच्या रचनात्मक वैशिष्ट्यांचा, भूगर्भशास्त्राचा आणि ऐतिहासिक भू-वैज्ञानिक प्रक्रियेचा अभ्यास करता येतो.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या