Nationwide Mock Drill | पहलगाममधील (Pahalgam Terror Attack) दहशतवादी हल्ल्यानंतर आणि पाकिस्तानच्या (Pakistan) सततच्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 7 मे रोजी संपूर्ण देशभरात नागरी संरक्षण मॉक ड्रिल (Nationwide Civil Defence Mock Drill) राबवण्याचे आदेश सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.
ही तयारी हल्ल्यांच्या (Hostile Attack) संभाव्य धोक्यांचा सामना करण्यासाठी करण्यात येत असून, 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर (India-Pakistan War) अशा स्वरूपाचा हा पहिलाच मॉक ड्रिल आहे.
मॉक ड्रिल म्हणजे नेमकं काय असतं?
मॉक ड्रिल (Mock Drill) ही एक नियोजित सुरक्षा तयारी असते, जिच्याद्वारे नागरिक, विद्यार्थी आणि आपत्कालीन सेवा यांना खऱ्या संकटाच्या परिस्थितीत कसे वागायचे याचा सराव करून दिला जातो. यामध्ये आग, भूकंप, वैद्यकीय संकटे, किंवा शत्रूच्या हल्ल्यांची तयारी यांचा समावेश होतो.
सुरक्षा सरावामध्ये काय होणार आहे?
- केंद्रीय गृह मंत्रालयाच्या (Union Home Ministry) अधिसूचनेनुसार, खालील बाबींवर सराव केंद्रित राहणार आहे:
- हवाई हल्ल्याचा इशारा देणाऱ्या सायरन्सची चाचणी
- भारतीय हवाई दल आणि नागरी अधिकाऱ्यांमधील त्वरित संपर्क यंत्रणा तपासणे
- नियंत्रण कक्ष व शॅडो रूम्स कार्यक्षमतेची चाचणी
- ब्लॅकआउट सरावाचा समावेश
- बचाव पथक, अग्निशमन दल , आणि स्थलांतरण योजनेचा सराव
- नागरिकांना प्राथमिक उपचार आणि स्वतःच्या सुरक्षिततेचे प्रशिक्षण
कोण सहभागी होणार?
देशभरातील 244 नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये (Civil Defence Districts) हा सराव होणार असून, त्यामध्ये जिल्हाधिकारी, नागरी संरक्षण स्वयंसेवक, होमगार्ड, एनसीसी (NCC), एनएसएस (NSS), एनवायकेएस (NYKS) आणि स्थानिक विद्यार्थी यांचा सहभाग असणार आहे.
देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही मॉक ड्रिल अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अशा सरावामुळे संभाव्य हल्ल्याच्या वेळी नागरिकांचा प्रतिसाद अधिक प्रभावी होतो आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे संरक्षण करता येते.