NATO Chief Warns India | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी काही दिवसांपूर्वीच ब्रिक्स देशांवर अतिरिक्त कर आकारण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता नाटोचे (NATO) सरचिटणीस मार्क रुटे (NATO Warns India) यांनी भारत, चीन आणि ब्राझीलला रशियासोबत व्यापार सुरू ठेवल्यास कठोर आर्थिक निर्बंधांचा सामना करावा लागेल, असा इशारा दिला आहे.
अमेरिकन सिनेटरांसोबत भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना रुटे यांनी बीजिंग, दिल्ली आणि ब्राझीलियातील नेत्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना शांतता चर्चेसाठी भाग पाडण्याचे आवाहन केले.
शांतता चर्चेची गरज
रुटे म्हणाले, “जर तुम्ही रशियापासून तेल आणि वायू खरेदी करत राहिलात आणि पुतिन शांतता चर्चेला गांभीर्याने घेत नाही, तर मी 100 टक्के दुय्यम निर्बंध लादेन. भारत, चीन आणि ब्राझीलच्या नेत्यांनी पुतिनला फोन करून शांतता प्रक्रियेसाठी वचनबद्ध करावे, अन्यथा मोठा फटका बसू शकतो.” त्यांनी या देशांना सावधान केले की, व्यापार सुरू ठेवल्यास गंभीर परिणाम होऊशकतात.
हा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला लष्करी मदत आणि रशियावर 100 टक्के शुल्क लादण्याची धमकी दिल्यानंतर आला आहे. ट्रम्प यांनी 50 दिवसांत शांतता करार न झाल्यास रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर निर्बंध लादण्याचा इरादा दिला होता.
ट्रम्प यांनी रशियाला मदत करणाऱ्या देशांवर 500 टक्के शुल्क लावण्याची योजना सिनेटच्या 85 सदस्यांनी पाठिंबा दिली आहे. काँग्रेसच्या परवानगीशिवायही दुय्यम शुल्क लादता येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे रशियन उप परराष्ट्र मंत्री सर्गेई रयाबकोव्ह यांनी ट्रम्पच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले आहे.
भारतावर परिणाम
भारत, चीन आणि तुर्की हे रशियन कच्च्या तेलाचे मोठे खरेदीदार आहेत. ट्रम्पच्या निर्बंधांमुळे ऊर्जा पुरवठा आणि जागतिक किमतींवर परिणाम होऊ शकतो, विशेषतः भारताला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा –