Home / देश-विदेश / Neeraj Chopra : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज लेफ्टनंट कर्नल बनला

Neeraj Chopra : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज लेफ्टनंट कर्नल बनला

Neeraj Chopra – जगातील दुसर्‍या क्रमांकाचा भालाफेकपटू भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता (Olympic gold medal)नीरज चोप्राची भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल (Honorary...

By: Team Navakal
Neeraj Chopra

Neeraj Chopra – जगातील दुसर्‍या क्रमांकाचा भालाफेकपटू भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता (Olympic gold medal)नीरज चोप्राची भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल (Honorary Lieutenant Colonel) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्लीत झालेल्या एका समारंभात संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी त्याला हे पद प्रदान केली.

यावेळी नीरज चोप्रा याची आई सरोज देवी (Saroj Devi), वडील सतीश चोप्रा (Satish Chopra), काका भीम चोप्रा (Bhim Chopra)आणि पत्नी हिमानी मोर (wife Himani) हे उपस्थित होते. हरियाणातील पानिपत येथील रहिवासी नीरज चोप्रा २६ ऑगस्ट २०१६ रोजी नायब सुभेदार (Naib Subedar)म्हणून सैन्यात दाखल झाला. २०२१ मध्ये त्याला सुभेदार म्हणून बढती देण्यात आली.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Olympic Games )सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याला सैन्याने परम विशिष्ट सेवा पदक प्रदान केले. त्याने सलग दोन ऑलिंपिक खेळांमध्ये देशासाठी पदके जिंकली आहेत. नीरजने पॅरिस ऑलिंपिकमध्ये रौप्य आणि टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. याव्यतिरिक्त जागतिक अजिंक्यपद स्पर्धा,आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल खेळ यासारख्या जागतिक दर्जाच्या स्पर्धांमध्ये भारतासाठी सुवर्णपदके जिंकली आहेत.

२०२२ मध्ये नीरजला सुभेदार (Neeraj Subedar) मेजर म्हणून बढती देण्यात आली होती. नीरज चोप्रा सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचा भालाफेकपटू आहे. त्याने सलग दोन ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदके जिंकली आहेत.त्याने विश्व अजिंक्यपद, आशियाई तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदके जिंकली आहेत.नीरजला २०१८ मध्ये अर्जुन पुरस्कार (Arjuna Award), २०२१ मध्ये खेलरत्न पुरस्कार (Khel Ratna Award)आणि २०२२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


हे देखील वाचा – 

Gold Price: सोन्याच्या किंमतीत अचानक मोठी घसरण होण्याचे कारण काय? जाणून घ्या

सोशल मीडियावरील कंटेंट हटवण्याचे नियम बदलले; केवळ ‘या’ अधिकाऱ्यांना असणार अधिकार

दीपिका-रणवीरची लेक ‘दुआ’ कोणासारखी दिसते? लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेअर केला मुलीचा फोटो

Web Title:
संबंधित बातम्या