NEET PG 2025 Exam | नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (National Board of Examinations in Medical Sciences) ने NEET PG 2025 परीक्षा पुढे ढकलल्याचे जाहीर केले आहे. बोर्डाने दिलेल्या अधिकृत नोटीसमध्ये, ही परीक्षा अधिक परीक्षा केंद्रे आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पूर्वी ही परीक्षा 15 जून 2025 रोजी होणार होती, पण सर्वोच्च न्यायालयाने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला. न्यायालयाने NEET PG 2025 दोन सत्रांऐवजी एकाच सत्रात घेण्याचे आदेश दिले होते.
न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने, संबंधित प्राधिकरणांना एकाच सत्रात परीक्षा आयोजित करण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते. तसेच, पूर्ण पारदर्शकता राखण्याचे आदेश दिले होते.
NBEMS लवकरच सुधारित परीक्षा तारीख जाहीर करणार!
NBEMS ने आपल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे की, NEET PG 2025 ची सुधारित तारीख लवकरच जाहीर केली जाईल. विशेष म्हणजे, बोर्ड परीक्षा शहराची माहिती स्लिप जारी केली जाणार होती.
NEET PG 2025 परीक्षा स्वरूप
- ही परीक्षा संगणक आधारित चाचणी (Computer Based Test) पद्धतीने घेतली जाणार आहे.
- परीक्षेसाठी 3 तास 30 मिनिटांचा वेळ दिला जाईल.
- परीक्षेत केवळ इंग्रजीमध्ये प्रत्येकी 4 उत्तरांचे पर्याय असलेले 200 बहुपर्यायी प्रश्न असतील.
अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी NBEMS च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला दिला आहे.