Home / देश-विदेश / संयुक्त राष्ट्रात मोठा ड्रामा! गाझामधील कारवाईवरून इस्रायलला धक्का; नेतन्याहूंचे भाषण सुरू असताच अनेक देशांच्या प्रतिनिधींचा सभात्याग

संयुक्त राष्ट्रात मोठा ड्रामा! गाझामधील कारवाईवरून इस्रायलला धक्का; नेतन्याहूंचे भाषण सुरू असताच अनेक देशांच्या प्रतिनिधींचा सभात्याग

Netanyahu UN Walkout: संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांचे भाषण सुरू असतानाच एक नाट्यमय घटना घडल्याचे...

By: Team Navakal
Netanyahu UN Walkout

Netanyahu UN Walkout: संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांचे भाषण सुरू असतानाच एक नाट्यमय घटना घडल्याचे पाहायला मिळाले. गाझामधील लष्करी कारवाईमुळे जागतिक स्तरावर एकटे पडलेल्या इस्रायलचा निषेध करत अनेक देशांच्या राजदूतांनी सभागृहातून वॉकआऊटकेल्याचे पाहायला मिळाले.

गाझामध्ये लवकरात लवकर आपले ‘काम पूर्ण’ करण्याची घोषणा नेतन्याहू यांनी आपल्या भाषणादरम्यान केली. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाकडून युद्ध गुन्ह्यांच्या आरोपांना सामोरे जात असलेल्या नेतन्याहू यांनी आपल्या भाषणापूर्वी गाझा पट्टीच्या आसपास लाऊडस्पीकर लावून पॅलेस्टिनींना ते ऐकण्याचे आदेश दिले होते.

या भाषणावेळी अनेक देशांच्या प्रतिनिधींनी नेतन्याहू यांचा निषेध करत सभात्याग केला.

अरब आणि मुस्लिम देशांचा मोठा सहभाग

रिपोर्टनुसार, नेतन्याहू यांचे भाषण सुरू होताच जवळजवळ सर्व अरब आणि मुस्लिम देशांचे प्रतिनिधी सभागृहातून बाहेर पडले. त्यांच्यासोबत अनेक आफ्रिकन आणि काही युरोपीय देशांच्या प्रतिनिधींनीही या वॉकआऊटमध्ये सहभाग घेतला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वगळता इस्रायलला आंतरराष्ट्रीय स्तरावर फारसा पाठिंबा मिळत नसल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले.

पॅलेस्टाईनचे अध्यक्ष ट्रम्प प्रशासनाने व्हिसा नाकारल्याने झाले नव्हते उपस्थित

यापूर्वी एका दिवस आधी पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांना ट्रम्प प्रशासनाने व्हिसा नाकारल्यामुळे त्यांनी संयुक्त राष्ट्राला ऑनलाइन संबोधित केले होते. त्यांनी गाझामधील नागरिकांना कितीही त्रास झाला तरी ते गाझा सोडून जाणार नाहीत, अशी शपथ घेतली होती.

‘बंद दाराआड कौतुक, उघडपणे निंदा’

नेतन्याहू यांनी आपल्या भाषणात या विरोधावर टीका केली. ‘जेव्हा परिस्थिती कठीण होते, तेव्हा तुम्ही शरण जाता,’ असे ते म्हणाले. मात्र, काही नेते सार्वजनिकरित्या आमचा निषेध करत असले तरी, ‘बंद दाराआड’ ते इस्रायलच्या गुप्तचर सेवांचे कौतुक करतात, कारण या सेवांनी त्यांच्या राजधानींमध्ये अनेक दहशतवादी हल्ले थांबवले आहेत, असा दावाही त्यांनी केला.

हे देखील वाचा –

मुंबईत कबुतरखान्यांसाठी जागा शोधण्याचे काम सुरू ! १३ ठिकाणे निश्चित केली

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या