Home / देश-विदेश / अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; व्हिसाचे नियम बदलले, ‘या’ चुका महागात पडणार

अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; व्हिसाचे नियम बदलले, ‘या’ चुका महागात पडणार

Indian Students USA Visa

Indian Students USA Visa: अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी (Indian Students USA Visa) अमेरिकेने काही महत्त्वाचे नियम जारी केले आहेत. अमेरिकेतील (USA Visa) भारतीय दूतावासाने एक नवीन आणि कठोर इशारा दिला आहे की, जर कोणत्याही विद्यार्थ्याने अमेरिकेतील कायद्याचे उल्लंघन केले, तर त्याचे F-1 किंवा J-1 व्हिसा रद्द केला जाऊ शकतो आणि त्याला भविष्यात कधीही अमेरिकेत प्रवेश दिला जाणार नाही.

अमेरिकेतील दूतावासाने ‘X’ (ट्विटर) वर एक पोस्ट शेअर करून म्हटले आहे की, “अमेरिकेच्या कायद्यांचे उल्लंघन केल्यास तुमच्या विद्यार्थी व्हिसावर गंभीर परिणाम होऊ शकतात. जर तुम्हाला अटक झाली किंवा तुम्ही कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केले, तर तुमचा व्हिसा रद्द होऊ शकतो. तुम्हाला देशातून हाकलले जाऊ शकते आणि भविष्यात तुम्ही अमेरिकेच्या व्हिसासाठी अपात्र ठरू शकता.”

एका अंदाजानुसार, 2024 या शैक्षणिक वर्षासाठी सुमारे 337,630 भारतीय विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेत आहेत.

व्हिसा नियमांमधील मोठे बदल

मुलाखत माफी (Interview Waiver) कार्यक्रम बंद:

2 सप्टेंबर 2025 पासून व्हिसा अर्ज प्रक्रियेत मोठा बदल होणार आहे. ज्या अर्जदारांना यापूर्वी मुलाखतीची गरज नव्हती, आता त्यांना अमेरिकेतील दूतावास किंवा वाणिज्य दूतावासात मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल.

यामुळे H, L, F आणि M (विद्यार्थी व्हिसा), J (एक्सचेंज व्हिसा) तसेच E आणि O व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांना फटका बसणार आहे. याशिवाय, 14 वर्षांपेक्षा कमी आणि 79 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अर्जदारांसाठी असलेली वयावर आधारित मुलाखत सूट आता रद्द करण्यात आली आहे.

पासपोर्ट घेण्यासाठी नवे नियम:

1 ऑगस्टपासून 18 वर्षांखालील व्यक्तींना वगळता, व्हिसा केंद्रातून दुसऱ्या कोणालाही आपला पासपोर्ट घेण्यासाठी पाठवता येणार नाही. अर्जदारांना स्वतः जाऊन पासपोर्ट घ्यावा लागेल किंवा नवीन कुरिअर डिलिव्हरी सेवेचा पर्याय निवडावा लागेल.

अल्पवयीन मुलांच्या बाबतीत, दोन्ही पालकांकडून स्वाक्षरी केलेले अधिकार पत्र (authority letter) असल्यासच त्यांचे पालक पासपोर्ट घेऊ शकतील. यासाठी स्कॅन केलेली किंवा ईमेल केलेली कॉपी स्वीकारली जाणार नाही. याशिवाय, अर्जदार 1,200 रुपये शुल्क भरून आपला पासपोर्ट घरपोच किंवा कामाच्या ठिकाणी मागवू शकतात.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

Dcm Ajit Pawar: डीवायएसपींनी ओळखले नाही ; अजित पवार प्रचंड संतापले

मुंबईच्या गणेशोत्सवावर १७ वर्षांत पालिकेचे २४७ कोटी रुपये खर्च

भारताने बनवली संपूर्णत: स्वदेशी मायक्रोप्रोसेसर चीप